जपानची कंपनी कावासाकी भारतात लवकरच आपली दमदार रेट्रो मोटरसायकल 2019 Kawasaki W800 लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या रेट्रो स्टाइल बाइकमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. यामध्ये एलइडी हेडलाइट, स्लिपर क्लच आणि ड्युअल चॅनल एबीएस फीचर्स आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ही बाइक स्ट्रीट आणि कॅफे रेसर अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध केली जाणार आहे. मात्र, भारतात फक्त स्ट्रीट बाइक लाँच करण्यात येणार आहे.

इंजिन –
कावासाकी डब्ल्यू800 मध्ये 773cc, एअरकूल्ड, फ्युअल-इंजेक्टेड, SOHC इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 6,500rpm वर 47.5hp ची पावर आणि 4,800rpm वर 62.9Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिनमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स असणार आहे.

ब्रेकिंग –
बाइकच्या पुढील बाजूला 320mm डिस्क आणि मागील बाजूला 270mm डिस्क ब्रेक आहे. या बाइकमध्ये 18 इंचाचे टायर आहेत.

टक्कर –
भारतीय बाजारात कावासाकीच्या या दमदार बाइकची Royal Enfield 650 Twins आणि Triumph Street Twin यांसारख्या बाइकसोबत टक्कर असेल.

किंमत –
सुमारे सहा लाख रुपये इतकी या बाइकची किंमत असण्याची शक्यता आहे.