वाहतुकीशी संबंधित हवाप्रदूषणामुळे शरीरातील उच्च घनतेच्या लिपोप्रोटिनची उच्च पातळी कमी होत असून यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांमध्ये वाढ होत असल्याचा इशारा एका नव्या संशोधनात देण्यात आला आहे.

हवाप्रदूषणामुळे हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस आणि हृदय बंद पडण्याबाबत संशोधकांना यापूर्वी माहीत आहे. मात्र याच्या थेट संबंधाबाबत अनिश्चितता होती, असे अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातील स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या ग्रिफिथ बेल यांनी म्हटले आहे.

शरीरातील कोलेस्टेरॉलची स्थिती उत्तम राहिल्यास हृदय आरोग्यदायी राहण्यास मदत होत असल्याचे अभ्यासात दिसून आले. या अभ्यासासाठी अमेरिकेतील ६,६५४ मध्यमवयीन आणि वृद्धांचा समावेश करण्यात आला होता. सहभागी करण्यात आलेले सर्व जण वाहतुकीमुळे होणाऱ्या हवाप्रदूषणामध्ये राहत होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील उच्च घनतेच्या लिपोप्रोटिनची उच्च पातळी कमी झाली होती.

वाहनांमधून बाहेर पडणारा काळा कार्बन हा सर्वात जास्त असुरक्षित असून वर्षभरामध्ये शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल कमी करण्याशी संबंधित आहे. महिला आणि पुरुष हवाप्रदूषणाला वेगळय़ा पद्धतीने प्रतिसाद देतात. लिपोप्रोटिनची घनता ही प्रदूषणामुळे पुरुष आणि महिलांमध्ये कमी होते. मात्र याचे प्रमाण महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.

लिपोप्रोटिन हवाप्रदूषण झाल्यामुळे घडून येते. मात्र त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांमध्ये वाढ होण्याचा धोका असल्याचे बेल यांनी सांगितले.