जिओने अल्पवधीतच भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. जिओने अनेक आकर्षक प्लॅन आणत मोबाईल धारकांना आपल्याकडे खेचले आहे. आता जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवा प्लॅन सादर केला आहे. प्री-पेड ग्राहकांसाठी हा प्लॅन आहे.

नवीन एअरटेल रिचार्जची किंमत १९५ रूपये आहे. २८ दिवसांच्या या अनलिमिटेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळेल. यासोबत अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हाईस कॉलिंगची सुविधा असणार आहे. १९५ रूपयांच्या या प्लॅनमध्ये एसएमएस सुविधा देण्यात आली नाही. सध्या हा प्लॅन फक्त आंध्र प्रदेश, तेलंगना आणि केरळमध्ये आमंलात आणण्यात आला आहे. लवकरच मुंबईसह महाराष्ट्रात हा प्लॅन लागू होणार आहे.

दरम्यान, मध्यंतरी एअरटेलने २८९ रूपयांचा प्लॅन आणला होता. यामध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हाईस कॉलची सुविधा होती. याशिवाय दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएसही मिळत होता. याची वैधता ४८ दिवसांची होती. शिवाय,  ४१९ रूपयाचा प्लॅनही  एअरटेलने आणला होता. याची वैधता ७५ दिवस आहे. ग्राहकांना या पॅकमध्ये अमर्यादित लोकल, एसटीडी कॉल (दररोज ३०० मिनिट आणि प्रत्येक आठवड्याला १००० मिनिट) मिळतात. ग्राहकांना या रिचार्ज पॅकमध्ये मोफत नॅशनल रोमिंग आणि १०० एसएमएस मिळतात.