नवे टॅरिफ प्लॅन्स लागू झाले असून हे प्लॅन्स आधीच्या तुलनेत महाग आहेत. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया आपल्या युजर्सना रिचार्ज प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देतायेत, तर रिलायंस जिओ आपल्या युजर्सना जिओ-टू-जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी FUP मिनिट्स देत आहे. जर तुम्ही एअरटेल ग्राहक आहात आणि अनलिमिटेड कॉलिंग असलेल्या प्लॅनचा विचार करत असाल तर आता एअरटेलने 3 नवे प्लॅन आणले आहेत. या तीन प्लॅन्समध्ये युजर्सना अन्य नेटवर्कवर मोफत अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळेल.

एअरटेलचा ₹219 प्रीपेड प्लान
एअरटेलच्या 219 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1GB डेटा मिळतो. याशिवाय, दररोज 100 SMS, मोफत Hello Tunes, अनलिमिटेड Wynk म्युझिक आणि एअरटेल Xstream अ‍ॅप यांचा अ‍ॅक्सेस मिळेल. २८ दिवस या प्लॅनची वैधता आहे.

आणखी वाचा- टेलिकॉम कंपन्यांचे ₹50 पेक्षा कमी किंमतीचे ‘बेस्ट डेटा प्लॅन्स’

₹399 प्रीपेड प्लॅन –
56 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये देशभरात अन्य कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा आणि दररोज 1.5GB डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS , मोफत Hello Tunes, अनलिमिटेड Wynk म्युझिक आणि एअरटेल Xstream अ‍ॅप यांचा अ‍ॅक्सेस मिळेल.

₹449 प्रीपेड प्लॅन –
एअरटेलच्या या प्लॅनची वैधताही ५६ दिवस असून यामध्येही देशभरात अन्य कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, दररोज 90 SMS, मोफत Hello Tunes, अनलिमिटेड Wynk म्युझिक आणि एअरटेल Xstream अ‍ॅप यांचा अ‍ॅक्सेस मिळेल.