08 July 2020

News Flash

Amazon Great Indian Festival ची झाली घोषणा, काय असणार ऑफर्स?

Amazon ने आणली खास 'फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर'

Amazon ने ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ची घोषणा केली आहे. प्राईम मेंबर्ससाठी 28 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासूनच हा सेल होईल. तर, सामान्यांसाठी 29 सप्टेंबर मध्यरात्रीपासून ते 4 ऑक्टोबर रात्री 11:59 पर्यंत हा सेल सुरू राहील.

Amazon’s Great Indian Festival 2019 मध्ये कोणत्या उपकरणांवर काय ऑफर असणार हे अद्याप समोर आलेलं नाही. पण, शंभरहून अधिक स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टीव्ही, घरगुती व स्वयंपाकघरातील वस्तू, फॅशन, किराणा व सौंदर्ये प्रसाधने यांसारख्या अनेक वस्तूंवर आकर्षक ऑफर्स मिळतील. लॅपटॉपवर 40 हजार रुपयांपर्यंत सूट, स्मार्टवॉचवर 50 टक्क्यांपर्यंत सूट आणि DSLR कॅमेऱ्यांवर किमान 10 हजार रुपयांची सवलत मिळेल. दुसरीकडे फ्लिपकार्टच्या Big Billion Days 2019 Sale ला देखील 29 सप्टेंबर रोजीच सुरूवात होत आहे.

यंदाच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय, एसबीआय डेबिटवर 10% इन्स्टंट बँक सूट, एक्सचेंज ऑफर आणि अन्य अनेक ऑफर असणार आहेत. Amazon ने खास ‘फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर’ देखील सुरू केली आहे. हा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल AmazonFestiveYatra च्या माध्यमातून सुरु करण्यात आला आहे. अॅमॅझॉन इंडियाने Amazon Festive Yatra साठी टाटा मोटर्स बरोबर भागीदारी केली आहे. ही यात्रा म्हणजे एकाच ठिकाणी भारतातील उत्तमोत्तम गोष्टी एकत्र आणणारी एक “हाऊस-ऑन-व्हील्स” योजना आहे. यामध्ये केवळ मोठ्या ब्रॅन्ड्सच्या वस्तू एकत्र आणलेल्या नसून लघु व मध्यम उद्योगातील इनोव्हेटीव्ह टेक प्रॉडक्ट्स, भारतातील स्टार्टअप्स चे हेल्थ फुड्स, हाताने तयार केलेल्या पारंपारिक आणि आगळ्यावेगळ्या हस्तकलेच्या वस्तू आणि भारतातील प्रत्येक राज्यातील व केंद्रशासीत प्रदेशातील शिल्पकार, विणकार, आदीवासी समूह यांनी तयार केलेल्या वस्तू यामध्ये असणार आहेत. भारतातील आदिवासी समूहांच्या कलेपासून, गुजरात येथील मीरर वर्क, आसाम येथील बांबू कला, तामिळनाडू येथील तंजोर पेंटींग्ज, खादी, इक्कत, पोचमपल्ली सारखे पारंपारिक विणकाम, मधुबनी प्रिन्ट, फुलकारी, राजस्थान येथील ब्लु पॉटरी आर्ट पर्यंत या वस्तू #AmazonFestiveYatra च्या ग्रेट इंडिया फेस्टिव्हल च्या माध्यमातून लोकांना बघायला व अनुभवायला मिळणार आहेत व यातून भारताच्या उद्यमांची व इनोव्हेशनची कल्पना देखील त्यांना येणार आहे.

छोट्या व मध्यम उद्योगांमधून निवडण्याव्यतिरिक्त Amamaon Festive Yatra मध्ये संपूर्ण उत्पादन प्रकारातील अनेक मोठे ब्रँड्स देखील समाविष्ट आहेत. यामध्ये इतर उत्पादनांबरोबर सॅमसंग आणि वनप्लस मोबाईल फोन्स, व्हर्लपूल आणि आयएफबी वॉशिंग मशीन्स, बॉश डिशवॉशर, व्होल्टाज, एलजी आणि गोदरेज एयर कंडीशनर्स, सोनी टेलीव्हीजन्स आणि फिलिप्स चे कीचन अप्लायंसेस असणार आहेत. अमूल, एचयूएल, पी अँड जी, आयटीसी अॅग्रो, लोरियल आणि इतर अशा लोकप्रिय एफएमसीजी ब्रँडमधून किराणा, स्वच्छता उत्पादने, सौंदर्य व सौंदर्यप्रसाधने, खाद्यान्न वस्तू प्रदर्शित केल्या गेल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 5:19 pm

Web Title: amazon great indian festival sale 2019 know all offers sas 89
Next Stories
1 कशी आहे Renault ची नवीन Triber?
2 Nokia 7.2 भारतात लाँच , 48MP क्षमतेचा कंपनीचा पहिलाच फोन; किंमत…
3 कार खरेदीकडे ‘नवतरुणांचा’ कल का कमी? ‘मारुती’च्या अध्यक्षांनी सांगितलं कारण
Just Now!
X