News Flash

Amazon Offer ! केवळ 3 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करा iPhone 6

दिवाळीमध्ये जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

दिवाळीमध्ये जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या सेलमध्ये आयफोनच्या अनेक मॉडेल्सवर डिस्काउंट आणि कॅशबॅकची ऑफर आहे. यामध्ये आयफोनचे लेटेस्ट फोन iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR यांचाही समावेश आहे. तसं पाहायला गेलं तर iPhone 6 हा जुना फोन आहे, पण सॉफ्टवेअर अपडेटमुळे आज देखील हा फोन युजर्सच्या पसंतीस उतरत आहे.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये हा फोन अवघ्या 3 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. म्हणजे, कंपनीने आयफोन 6 वर शानदार एक्सचेंज ऑफर आणली आहे. या सेलमध्ये आयफोन 6 ची किंमत 19 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. यासोबत कंपनी 16 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. ज्यांना हा फोन खरेदी करायची इच्छा असेल, ते आपल्या जुन्या फोनची एक्सचेंज ऑफरमध्ये किती किंमत मिळेल हे अॅमेझॉनवर पाहू शकतात. त्यानंतर उर्वरीत पैसे भरुन आयफोन 6 खरेदी करु शकतील. जर तुमच्या जुन्या फोनची किंमत 16 हजार इतकी मिळत असेल तर केवळ 3 हजार 999 रुपयांमध्ये हा फोन तुमचा होऊ शकतो. याशिवाय, एचडीएफसी बँकेचं कार्ड वापरून 1500 रुपये अतिरिक्त कॅशबॅक, अॅमेझॉन पे बॅलेंस अॅप वापरून 1000 रुपये अतिरिक्त कॅशबॅक मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 1:01 pm

Web Title: amazon offer iphone 6 at rs 3999
Next Stories
1 दिवाळीसाठी घर सजवताय? मग हे वाचाच
2 जाणून घ्या कसे पाठवायचे whatsapp stickers
3 Diwali 2018 Special Recipes : ‘खजूर नी पॅटीस’
Just Now!
X