ई कॉमर्स वेबसाईट असलेली अॅमेझॉन कंपनी आपल्या ग्राहकांना एक अनोखी संधी देत आहे. यामध्ये ग्राहकांनी काही प्रश्नांची उत्तरे दिल्यास त्यांना सारेगम कारवाँ जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा जिंकणे अतिशय सोपे असून त्यासाठी ग्राहकांना अतिशय सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. यासाठी सुरुवातीला ग्राहकांना आपल्या मोबाईलवर अॅमेझॉनचे अॅप डाऊनलोड करावे लागेल. यामध्ये साईन-इन केल्यावर होम पेडवरच डेली क्विजचा बॅनर दिसेल. ही संधी सकाळी ८ वाजल्यापासून सकाळी १२ पर्यंत उपलब्ध असेल. यामध्ये ग्राहकांना ५ प्रश्न विचारले जातील. त्यांची योग्य उत्तरे दिल्यानंतर तुम्ही लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊ शकता. यामध्ये तुमचे नशीब चांगले असेल तर तुम्हाला कारवाँ मिळू शकणार आहे. ही क्विझ केवळ आजच्या दिवशीची असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
ज्यांना जुनी गाणी ऐकण्याची आवड आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. यामध्ये आधीच असंख्य गाणी लोड करण्यात आलेली आहेत. २०१७ मध्ये हे उत्पादन बाजारात आले होते. त्याला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. अवघ्या तीन महिन्यात याची ९५ हजार युनिटस विकली गेली होती. हा सारेगम कारवाँ तुम्ही बाजारातून खरेदी केला तर त्याची किंमत ५ ते ७ हजार रुपये इतकी आहे. मात्र अॅमेझॉनवर तुम्हाला हे उत्पादन भेट म्हणून मिळू शकणार आहे. या स्पर्धेत विजयी झालेल्यांची नावे २८ फेब्रुवारी किंवा त्याआधी जाहीर केली जाणार आहेत. विजेत्यांना ई-मेल आणि मेसेजद्वारे ते जिंकल्याची माहिती दिली जाईल.
याआधी अॅमेझॉनने Sony Alpha DSLR Camera, Bose wireless headphones, honor Band, Apple watch 3, Samsung galaxy Note 8, Samsung Galaxy Tab S3, iPhone X ही उत्पादने भेट म्हणून देण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तुम्ही अॅमेझॉनच्या मेलिंग लिस्टमध्ये सहभागी व्हाल. म्हणजेच अॅमेझॉन तुम्हाला प्रमोशनल ई-मेल पाठवू शकेल. तुम्हाला ही सुविधा नको असेल तर तुम्ही ही सुविधा डिअॅक्टिव्हेटही करु शकता. तुम्ही जर विजेते म्हणून घोषित झालात तर तुम्हाला तुमची ओळख पटवून द्यावी लागणार आहे. यासाठी पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, वोटर आयडी किंवा पासपोर्ट यांपैकी एक कागदपत्र देऊ शकता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 12:11 pm