इग्लू वगैरे प्रकार आपल्यासाठी फक्त पुस्तकात किंवा टीव्हीपुरताच मर्यादित आहे. लहानपणापासून मुळाक्षरांच्या पुस्तकात पाहिलेलं इग्लूचं चित्र आपण पाहतो आणि त्याच्याविषयी कुतूहल निर्माण होतं

आर्क्टिक प्रदेशातलं इग्लू (सौजन्य: विकीस्पेसेस)
आर्क्टिक प्रदेशातलं इग्लू (सौजन्य: विकीस्पेसेस)

आर्क्टिक प्रदेशात राहणाऱ्या एस्किमो लोकांच्या या बर्फाच्या घराकडे पाहून बर्फाच्याच घरात राहून ऊब कशी मिळत असेल असं वाटायचं पण या घरातही उष्णता साठून राहते आणि आतल्या माणसांना बाहेरच्या भीषण थंडीपासून वाचवते.
आता भारतीयांनासुध्दा ‘इग्लू’मध्ये राहण्याचा अनुभव घेता येणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मनाली शहरापासून काही किलोमीटर दूर एक हाॅटेल सुरू झालंय आणि या हाॅटेलमधल्या सगळ्या खोल्या म्हणजे बर्फाने बनवलेली इग्लू आहेत.
‘मनाली इग्लू स्टे’ या हाॅटेलच्या या खोल्यांमध्ये तुम्ही गोठणार नाही. त्यासाठी तुम्हाला जाडजूड गाद्या आणि पांघरूणं दिली जातात.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
बर्फातली उबदार खोली
बर्फातली उबदार खोली

तुम्हाला तुमचा इग्लू स्वत: बनवायचाय़? त्यासाठी ही या हाॅटेलकडून साहित्य पुरवलं जातं. अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची आवड असणाऱ्यांनाही तिथे ही साहित्यं दिली जातात. बर्फात खेळायची मजा तर नेहमीच लुटता येते.

वाचा- गगनचुंबी इमारतीत उभं राहणार जंगल
या इ्ग्लूमध्ये राहण्याचे दर ४६०० रूपयांपासून पुढे सुरू होतात. पण या इग्लूंच्या आसपास मनालीच्या थंड वातावरणात कँपिंग करण्याची सोय़सुध्दा इथे दिलेली आहे. त्याचे दर कमी आहेत.
काहीही असो. पर्यटकांची कुलू-मनालीसारख्या पर्यटनस्थळांना नेहमीच पसंती राहिली आहे. आणि त्यातही मनालीजवळच उभारण्यात आलेलं ‘मनाली इग्लू स्टे’ हाॅटेल एक नवीन काॅन्सेप्ट वाटतोय. यातल्या एका खोलीचा व्हिडिओ फेसबुकवर आम्हाला मिळाला. पहा आवडतंय हे बर्फाचं घर!