आजकाल व्हॉट्सअ‍ॅपच्या वापर करत नसेल अशी क्वचितच व्यक्ती सापडेल. परंतु व्हॉट्सअ‍ॅपवर असलेला आपला मोबाईल क्रमांक गुगल सर्चमध्ये दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंशी लिंक असलेला आपला फोन क्रमांक कोणाही गुगलमध्ये सर्च करून पाहू शकतो असा दावा एका रिसर्चरनं केला आहे. तसंच एखाद्या युझरसाठी हा प्रायव्हसी इश्यू असल्याचं म्हटलं जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर असलेल्या क्लिक टू चॅट या फिचरमुळे युझरचा मोबाईल क्रमांक गुगलवर सर्च होतो आणि यावर कोणाही मेसेज करू शकतात असाही दावा या रिसर्चरनं केला आहे.

बग बाऊंटी हंटर अतुल जयरान यानं याचा शोध लावला आहे. तसंच युझरचे फोन क्रमांक लीक होत असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. दरम्यान हा एकप्रकारचा सिक्युरिटी बग असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील क्लिक टू चॅट या ऑप्शनमुळे युझरला वेबसाईट्सवर विझिटर्ससोबत चॅट करण्याचा पर्याय मिळतो. हे फिचर क्यूआर कोडच्या मदतीनं काम करतं. तसंच एका युआरएलवर क्लिक करूनही चॅट करणं शक्य आहे.

फिचरमुळेच नंबर होतो सर्च

साईटवर येणारा व्हिजिटर दिल्या गेलेल्या क्युआर कोडला स्कॅन करून अथवा लिंकवर क्लिक करून चॅटिंग करू शकतो. तसंच त्यासाठी त्याला व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाची गरज भासत नाही. एकदा चॅटिंग सुरू केल्यानंतर त्यात व्हिजिटरचा मोबाईल क्रमांक दिसू लागतो. असे क्रमांक थेट गुगलवर सर्च होत असल्याचा दावा जयराम यानं केलं आहे. सर्च इंजिन चॅन मेटाडेटालादेखील इनडेक्स करतं. युझरचा मोबाईल क्रमांक https://wa.me/<0PhoneNumber)> या यूआरएल वरून गुगल सर्चवर दिसतो.

व्हॉट्सअ‍ॅपकडूनही स्पष्टीकरण

यासंदर्भात व्हॉट्सअ‍ॅपकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक टू चॅट ही फिचर देण्यात आलं आहे. तसंच त्यात प्रायव्हसी बग सारखं काही नाही. सार्वजनिक वेबसाईट्सवर चॅटिंगसाठी ऑप्शन दिला आहे केवळ त्यांचेच मोबाईल क्रमांक ऑनलाइन उपलब्ध असल्याचं व्हॉट्सअ‍ॅपचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे रिसर्चरच्या म्हणण्यानुसार युझर्सला त्यांचे मोबाईल क्रमांक प्लेन टेक्स्टमध्ये दिसत असल्याची कल्पना नाही. तसंच या मोबाईल क्रमांकाचा गैरवापरही केला जाऊ शकतो आणि अनेक युझर्सच्या फोटोंच्या मदतीनं त्यांच्या सोश अकाऊंट्सपर्यंतही पोहोचता येऊ शकतं, असंही त्यानं म्हटलं आहे.