News Flash

‘अ‍ॅपल’वर ‘Sign in with Apple’ फीचर चोरल्याचा आरोप

कोर्टात आरोप सिद्ध झाल्यास अ‍ॅपलला मोठा फटका बसू शकतो

स्मार्टफोन कंपन्यांवर इतर कंपन्यांचे फीचर्स चोरल्याचे आरोप सतत होत असतात. आता या यादीमध्ये अग्रगण्य कंपनी Apple चा समावेश झाला असून Blue Mail ची निर्माती कंपनी Blix ने अ‍ॅपलवर फीचर चोरल्याचा आरोप केला आहे. अ‍ॅपलने iOS 13 मध्ये दिलेलं ‘Sign in with Apple’ फीचर चोरल्याचा आरोप Blix ने केला आहे.

ब्लिक्सने अ‍ॅपलविरोधात अमेरिकेच्या एका कोर्टात याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. साइन इन फीचर ‘Share email’ द्वारे कॉपी करण्यात आल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. या फीचरसाठी २०१७ मध्येचं पेटंट घेतलं होतं असं ब्लिक्सने म्हटलं आहे. अद्याप अ‍ॅपलकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण कोर्टात हे आरोप सिद्ध झाल्यास अ‍ॅपलला मोठा फटका बसू शकतो, तसेच त्यांना नुकसान भरपाई म्हणून मोठी किंमत चुकवावी लागेल.

काय आहे हे फीचर –
याद्वारे युजर आपला खरा इमेल आयडी न टाकताही अ‍ॅप्ससाठी साइन इन करु शकतात. या फीचरमुळे युजरला केवळ एका टचद्वारे अॅप्स आणि अन्य सेवा वापरता येतात. लॉगइन करण्यासाठी फेस आयडी /टच आयडीद्वारे व्हेरिफिकेशन केलं जातं. या फीचरद्वारे युजरला टेंपररी आयडी देखील बनवता येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 9:55 am

Web Title: apple accused of copying stealing tech for sign in with apple feature sas 89
Next Stories
1 गुजरातमध्ये अचानक कोसळला पूल, मधोमध लटकल्या कार
2 हृदयद्रावक! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात धबधब्यावरुन पडून सहा हत्तींचा मृत्यू
3 अविवाहित परदेशी जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची परवानगी, सौदी अरेबियाचा निर्णय
Just Now!
X