News Flash

लंग कॅन्सरसाठी इम्युनोथेरपी – आशादायी व क्रांतिकारी उपचार पर्याय

इम्युनोथेरपी हा उपचाराचा एक प्रकार

जगभर कॅन्सरशी संबंधित मृत्यूंमध्ये लंग कॅन्सर हे एक मुख्य कारण आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबोकॅन डाटा 2018 च्या मते, लंग कॅन्सरचे नवे 67,795 रुग्ण आढळले व त्यामध्ये भारतातील सर्व प्रकारच्या कॅन्सरचे प्रमाण 5.9 टक्क्यांहून अधिक आहे. हा प्रकार पुरुषांमध्ये अधिक असून, 2018 मध्ये भारतात 38,687 नवे रुग्ण आढळले व सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये हे प्रमाण 8.5% होते. हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात सामायिक कॅन्सर आहे आणि कॅन्सरशी संबंधित मृत्यूंचे तिसरे सर्वात मोठे कारण आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीज व टायरॉसिन किनेसिस इनहिबिटर्स या स्वरूपातील टारगेटेड थेरपीमुळे लंग कॅन्सर झालेल्या रुग्णांसाठी म्युटेशनसह चांगले उपचार पर्याय उपलब्ध केले आहेत (उदा, एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर [ईजीएफआर]-म्युटंट, अनाप्लास्टिक लिम्फोमा किनेस [एएलके]-रिअरेंज्ड एनएससीएलसी). परंतु, बहुसंख्य रुग्णांमध्ये अशा प्रकारे जेनेटिक अल्टरेशनचा अभाव असतो; त्यांच्यासाठी या थेरपी प्रभावी ठरत नाहीत. या रुग्णांसाठी इम्युनोथेरपी हा उपचारांचा अविभाज्य भाग बनला आहे आणि रोगातून बचावण्यात व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात मदत झाली आहे.

इम्युनोथेरपी हा उपचाराचा एक प्रकार असून, त्यामध्ये कॅन्सरची वाढ मंदावण्यासाठी व थांबवण्यासाठी शरीराच्या प्रतिकार क्षमतेचा वापर केला जातो. शरीरातील सर्वसाधारण पेशींपेक्षा वेगळा असणारा ट्युमर ओळखण्यासाठी विविध स्वरूपांतील इम्युनोथेरपी विकसित केली जात आहे. या इम्युनोथेरपीपैकी एक दृष्टिकोन म्हणजे, चेकपॉइंट इनहिबिटर्स नावाचा औषधांचा समूह. निरोगी पेशींवर हल्ला करण्यापासून रोखण्याच्या हेतूने “चेकपॉइंट” म्हणजे प्रतिकार यंत्रणेचा बिल्ट-इन भाग असतो. चेकपॉइंट इनहिबिटर्स शरीराच्या लिम्फोसायटिसवर (संसर्गाशी झगडण्यामध्ये सहभागी असणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार) कृती करतात व कॅन्सरचे पेशी ओळखण्यासाठी व नष्ट करण्यासाठी मदत करतात.

फुप्फुसाच्या कॅर्सिनोमाच्या उपचारासाठी सध्या 3 इम्युनोथेरपी औषधे मान्यताप्राप्त आहेत. ही औषधे प्रत्येक 2-3 आठवड्यांनी इंट्राव्हेन्सद्वारे दिली जातात. योग्य निवडक प्रगत लंग कॅन्सरसाठी दिल्यास, ही औषधे अत्यंत प्रभावी असतात. या औषधांमुळे रिस्पॉन्स रेट वाढला आहेच, शिवाय कॅन्सर प्रगत स्थितीत असणाऱ्या रुग्णांचे आयुष्यही वाढले आहे. सर्रास आढळत नसले तरी ही औषधे दीर्घ काळ हा आजार नियंत्रणात ठेवू शकतात.

इम्युनोथेरपीचे दुष्परिणाम त्याच्या कृतीशी संबंधित असतात. ही कृती प्रतिकार यंत्रणेला कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करू देते. यामुळे निरोगी पेशींवरही परिणाम होऊ शकतो; परिणामी, अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, जसे त्वचेवर परिणाम, कोलायटिस (कोलनचे इन्फ्लेमेशन), न्युमोनायटिस (फुप्फुसाचे इन्फ्लेमेशन), व थायरॉइड आजारासारखी एंडोक्रिन डिसऑर्डर. परंतु, वरील सर्व दुष्परिणाम सर्रास आढळत नाहीत व केमोथेरपीपेक्षा फार कमी आहेत. भविष्यात, या औषधांच्या उपलब्धतेमुळे, आजारावर नियंत्रण आणण्यासाठी इम्युनोथेरपी औषधांची सांगड केमोथेरपी व रेडिएशन थेरपी यांच्याशी घातली जाईल. लंग कॅन्सरशी लढण्यासाठी हे नवे शस्त्र निर्माण झाले आहे. परंतु, नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने सध्या ही औषधे महाग आहेत आणि देशातील अनेकांना उपलब्ध नाहीत. या औषधांमुळे लंग कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

– डॉ. मुझम्मिल शेख (कन्सल्टंट मेडिकल ओन्कोलॉजी, हिंदूजा हेल्थकेअर सर्जिकल)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 3:23 pm

Web Title: article on lung cancer
Next Stories
1 RBI मध्ये दहावी पास असणाऱ्यांसाठी बंपर भरती
2 Jawa च्या 3 शानदार मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या सर्वकाही
3 11 हजार रुपयांत बुक करा नवी Maruti Ertiga, 21 नोव्हेंबरला होणार लाँच
Just Now!
X