25 November 2020

News Flash

आत्मनिर्भर भारत: चिनी अ‍ॅपला टक्कर, IIT बॉम्बेच्या विद्यार्थानं तयार केलं स्कॅनिंग अ‍ॅप

आत्मनिर्भर भारत’ आव्हानातून प्रेरणा घेत या विद्यार्थ्यांनी हे मोफत ॲप तयार केले

जून महिन्याच्या अखेरीस भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप बॅन केले. बॅन झालेल्या चिनी अ‍ॅपमध्ये कॅमस्कॅनर या लोकप्रिय चिनी अ‍ॅपचाही समावेश आहे. कॅमस्कॅनरद्वारे फोनच्या कॅमेऱ्याचा स्कॅनरप्रमाणे वापर करुन पीडीएफ फाइल्स क्रिएट करता येत होत्या व या फाइल्स डॉक्युमेंटप्रमाणे शेअर करता यायच्या. भारतातील अनेक युजर्स कॅमस्कॅनरला चांगल्या पर्यायाच्या शोधात होते. अशातच आता एक नवीन ‘मेड इन इंडिया’ अ‍ॅप लाँच झालं आहे. आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थांनी नवीन अ‍ॅप डेव्हलप केलं आहे.

रोहित कुमार चौधरी, केविन अग्रवाल या विद्यार्थ्यांनी चिनी अ‍ॅपला टक्कर देत हे ॲप तयार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ आव्हानातून प्रेरणा घेत या विद्यार्थ्यांनी हे मोफत ॲप तयार केले आहे. एआयआर स्कॅनर (AIR Scanner) असे या मोबाईल ॲपचे नाव असून १५ ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे, ज्या वापरकर्त्यांना इंग्रजी वाचताना अडचण येतेय त्यांच्यासाठी हे अ‍ॅप कागदपत्राचे वाचनही करेल. हे अॅफ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत (Artificial Intelligence) आहे. या अ‍ॅपविषयी बोलताना रोहित कुमार चौधरी म्हणाले, “सुरुवातीला आम्ही इंग्रजी वाचन कठीण जाते, त्यांच्यासाठी ॲप तयार करण्यावर काम करत होतो. त्यादरम्यान सरकारने चिनी मोबाईल अॅपवर बंदी घातली. त्यामध्ये कॅमस्कॅनरचाही समावेश होता. त्यांनंतर आम्ही आमच्या एआयआर ॲपमध्ये स्कॅनिंग जोडण्याचा निर्णय घेतला”

प्ले स्टोअरवर आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त जणांनी हे अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. सध्या हे ॲप फक्त अँड्रॉईड फोनधारकांसाठी उपलब्ध आहे, लवकरच तो आयओएस वापरकर्त्यांनाही उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.hind.airscanner  या लिंकवर क्लिक करा..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 9:42 am

Web Title: atma nirbhar bharat iit bombay students launch scanning apps nck 90
Next Stories
1 जाणून घ्या, पदार्थाची चव वाढविणाऱ्या मोहरीचे गुणकारी १० फायदे
2 ट्विट कॉपी पेस्ट करताय? मग हे वाचाच; ट्विटरने घेतला मोठा निर्णय
3 ओठांच्या सौंदर्यासाठी वापरा ‘या’ चार टीप्स
Just Now!
X