करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला देशात कडक लॉकडाउन घेण्यात आला होता. आता चार महिन्यानंतर देश पुन्हा अनलॉक होत आहे. बँका आणि सरकारी कार्यालये पूर्णवेळ सुरु ठेवली जात आहेत. बँका सुरु झाल्यामुळे अनेकजण बँकेची राहिलेली कामं पूर्ण करत आहेत.

शनिवारपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे येत्या महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार? कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? याची माहिती नागरिकांना असणं अत्यंत गरजेचं आहे. बँका कोण-कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत हे समजल्यास नागरिक बँकेशी निगडीत असलेलं काम तात्काळ पूर्ण करून घेतील. परिणामी खातेधारकांना त्यांच्या कामात होणारा उशिरही टाळता येईल. ऑगस्ट महिन्यात ९ दिवस बँक बंद राहणार आहेत.

रक्षाबंधन, कृष्णा जन्माष्टमी, बकरी ईद, हरिततालिका, गणेश चतुर्थी, स्वातंत्र दिन आणि मोहरमसारखे सण आहेत. पण काही सण सुट्ट्यांच्या दिवशी आले आहेत. तर काही सणांच्या महाराष्ट्रात सुट्ट्या नसतात.

ऑगस्ट महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या –
१ ऑगस्ट शनिवार – बकरी ईद
२ ऑगस्ट रविवार
८ ऑगस्ट दुसरा शनिवार
९ ऑगस्ट रविवार
१५ ऑगस्ट शनिवार – स्वातंत्र्य दिन
१६ ऑगस्ट रविवार
२२ ऑगस्ट शनिवार गणेश चतुर्थी
२३ ऑगस्ट रविवार
३० ऑगस्ट रविवार