03 August 2020

News Flash

सर्वसाधारण व्यक्ती दिवसातून चार गोष्टी नक्की विसरतात!

सध्याच्या धकाधकीच्या जीवनाला शरण गेलेला सामान्य माणूस प्रत्येक दिवशी चार महत्त्वाच्या गोष्टी विसरत असल्याचे संशोधनातून पुढे आले.

| September 24, 2013 11:40 am

सध्याच्या धकाधकीच्या जीवनाला शरण गेलेला सामान्य माणूस प्रत्येक दिवशी चार महत्त्वाच्या गोष्टी विसरत असल्याचे संशोधनातून पुढे आले. काही महत्त्वाची माहिती, कार्यक्रम, टिपणं यापैकी कोणत्याही चार गोष्टी सर्वसामान्य व्यक्ती प्रत्येक दिवसाला विसरते, असे संशोधनात आढळले. प्रत्येक वर्षाला सर्वसाधारण व्यक्ती १४६० गोष्टी लक्षात ठेवून वेळेत पूर्ण करायला विसरते.
संशोधकांनी इंग्लंडमधील एकूण दोन हजार व्यक्तींचे सर्वेक्षण केले. सर्वसाधारणपणे विसरण्यात येणाऱया ५० गोष्टींची यादी संशोधकांनी तयार केली. त्यामध्ये घरातील एखाद्या खोलीत आपण का गेलो, हे अनेकांना लगेचच लक्षात येत नाही. अनेक जण घरातून बाहेर पडताना मोबाईल घ्यायला किंवा पाकिट घ्यायला विसरतात. पुरुष हे शक्यतो पत्नीच्या किंवा लग्नाच्या वाढदिवसाची तारीख विसरतात, असे संशोधकांना आढळून आले.
जर एखादी गोष्ट करायला विसरले, तर महिलांना त्याबद्दल खूप वाईट वाटते. कामाचे वाढलेले तास, आर्थिक भीती, धकाधकीचे जीवन यामुळे चांगली स्मृती असलेल्या व्यक्तीही काही साध्या गोष्टी नक्की विसरतात, असे संशोधकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2013 11:40 am

Web Title: average person forgets four things a day study
टॅग Lifestyle
Next Stories
1 कमी झोपणारी कुमारवयीन मुले होतात जाड!
2 ८ तासांपेक्षा जास्त काम करणा-यांना हृदयरोगाचा धोका
3 सोशल मिडियावर जास्तवेळ म्हणजे स्मृतिभ्रंशाला आमंत्रण!
Just Now!
X