केळी, धान्ये, बटाटे व डाळी यांच्यात असलेल्या प्रतिरोधक स्टार्चमुळे आरोग्याला उलट फायदा होतो, रक्तशर्करा नियंत्रणात राहते, पोटाचे आरोग्य बिघडत नाही व त्याची क्षमता टिकून राहते, असे नवीन संशोधनात म्हटले आहे. आर्यलडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन या संस्थेतील वैज्ञानिकांनी प्रतिरोधक स्टार्चच्या फायद्यांचा आढावा घेतला असून हे स्टार्च अशा प्रकारचे असते, ज्याचे पचन लहान आतडय़ात होत नाही. त्यामुळे तो आहारातील तंतुमय घटक मानला जातो. काही प्रकारचे प्रतिरोधक स्टार्च केळी, बटाटे, धान्ये व डाळी यात नैसर्गिक पातळीवर असते. त्यात काही सुधारणा करून अन्न उत्पादन म्हणून त्याचा वापर करता येईल, असेही संशोधकांचे मत आहे. प्रतिरोधक स्टार्चबाबत बरीच उत्सुकता असून आतापर्यंत गेल्या दहा वर्षांतील आरोग्य अभ्यास अहवालांचा या संशोधनात परामर्श घेण्यात आला आहे. या स्टार्चचे अनेक फायदे असल्याचे सांगण्यात आले. या स्टार्चमुळे रक्तशर्करा नियंत्रण चांगले होते असे दिसून आले आहे. प्रतिरोया स्टार्चमुळे रक्तशर्करा नियंत्रण चांगले होते असे दिसून आले आहे. धक स्टार्च हे आतडय़ाच्या आरोग्यास पूरक असते व लघू साखळी मेदाम्लांचे प्रमाण त्यामुळे वाढते. रोज तीस ग्रॅम तंतुमय आहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे अनेक आजारांना आळा बसतो, असे ब्रिटिश न्यूट्रिशन फाऊंडेशनच्या स्टॅसी लॉकयर यांनी म्हटले आहे. प्रतिरोधक स्टार्च हा तंतुमय आहाराचाच प्रकार आहे, असे त्यांचे मत असून लोकांना त्याचा फायदाच होईल, असे त्यांनी सांगितले. हे संशोधन जर्नल न्यूट्रिशन बुलेटिनमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन