News Flash

Google Chrome वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सायबर सुरक्षा संस्थेने दिला ‘हा’ इशारा

केवळ ज्यांची आवश्यकता आहे आणि जे सुरक्षित आहेत तेच एक्स्टेंशन युजर्सनी वापरावे असा सल्ला

सायबर सुरक्षा एजन्सी ‘द कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टिम ऑफ इंडिया’ने (सीईआरटी-इन) बुधवारी इंटरनेट युजर्सना गुगल क्रोमसाठी एक्स्टेंशन इन्स्टॉल करताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. सायबर एजन्सीने युजर्सना क्रोमचे धोकादायक एक्स्टेंशन अनइंस्टाल करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच केवळ ज्यांची आवश्यकता आहे आणि जे सुरक्षित आहेत तेच एक्स्टेंशन युजर्सनी वापरावे असा सल्लाही देण्यात आला आहे.

गुगलने क्रोम वेब स्टोअरमधून क्रोम ब्राउझरचे 106 धोकादायक एक्स्टेंशन हटवले असल्याची माहिती एजन्सीकडून यावेळी देण्यात आली. हे सर्व एक्स्टेंशन वेब सर्चचा चांगला अनुभव देण्यासाठी, एखादा फाइल फॉर्मेट दुसऱ्या फॉर्मेटमध्ये चेंज करण्यासाठी जारी करण्यात आले होते. हटवण्यात आलेल्या लिंक्स युजरच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक होत्या, यामध्ये स्क्रीनशॉट घेणे , क्लिपबोर्ड आणि युजरच्या पासवर्डसह अन्य गोपनिय माहिती चोरी करण्याची क्षमता होती, असे एजन्सीकडून सांगण्यात आले.

सायबर एजन्सीने युजर्सना क्रोमचे एक्स्टेंशन अनइंस्टाल करण्याचा सल्ला दिला आहे. युजर गुगल क्रोम पेजवर जाऊन डेव्हलपर मोड एनेबल करु शकतात. तिथे धोकादायक एक्स्टेंशन इंस्टॉल केलं आहे की नाही हे तपासून त्याप्रमाणे ते रिमुव्ह करु शकतात. केवळ ज्यांची आवश्यकता आहे आणि जे सुरक्षित आहेत तेच एक्स्टेंशन युजर्सनी वापरावे, जे कामाचे नाहीत ते रिमुव्ह करावेत असा सल्ला एजन्सीकडून देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 2:45 pm

Web Title: be cautious while installing google chrome extensions says cyber security agency cert in sas 89
Next Stories
1 मुरुम, पुटकुळ्यांना कंटाळलात? मग वापरुन पाहा तांदळाच्या पीठाचा फेसमास्क
2 स्वस्त OnePlus TV आज होणार लाँच, प्री-बुकिंगलाही झाली सुरूवात
3 मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी; कारण…
Just Now!
X