लहान बाळांची त्वचा ही वयस्क व्यक्तींच्या तुलनेमध्ये प्रचंड नाजूक असते. लहान असताना त्यांच्या त्वचेमध्ये वेगाने बदल घडून येत असतो. जन्मल्यानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये सर्वसामान्यतः होणारे हार्मोन्समधील बदल किंवा नाजूक त्वचाछिद्रांमुळे तसेच काही संसर्गामुळे त्वचेवर लाल चट्टे येणे, जळजळ होणे असे प्रकार होत असतात. लहान बाळांच्या त्वचेतील पाण्याच्या प्रमाणात वेगाने चढ-उतार होत असतात, त्यांच्या त्वचेमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग घटक कमी असतात, त्यामुळे त्यांची त्वचा बऱ्याचदा शुष्क व कोरडी असते. त्यातच हिवाळ्यामध्ये हे प्रमाण वाढते. मात्र आपल्या ते पटकन लक्षात येत नाही. त्यामुळेच हिवाळ्यामध्ये त्यांच्या त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.

१. बाळाची अंघोळ-
हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला बराच वेळ अंघोळ घालत बसू नये. कोमट पाण्याने पटकन त्याची अंघोळ करुन लगेच त्यांचं अंग सुती, मऊ कापडाने पुसून घ्यावे. तसंच अंघोळी पूर्वी त्यांच्या संपूर्ण शरीराला तेल लावून हलक्या हाताने मालिश करावी.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

२. कपडे –
बऱ्याच वेळा बाळाला थंडी वाजेल म्हणून स्त्रिया बाळाला जाड कपडे घालतात. मात्र या कपड्यांमुळेही त्यांना त्रास होऊ शकतो. त्यांच्या अंगावर हिट रॅशेस येऊ शकतात. त्यामुळे बाळाला जाड कपडे घालण्याऐवजी लोकरीचे किंवा उबदार कपडे घालावेत. त्यामुळे त्यांच्या त्वचेला कोणतीही इजा पोहोचत नाही.

३. डायपरचा वापर –
लहान बाळ कपडे ओले करु नये म्हणून त्याला डायपर घालतात. मात्र हे डायपर बराच वेळ ओलं राहिलं तर बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्या त्वचेवर लाल रॅशेस येऊ शकतात. त्यामुळे थोड्या-थोड्या वेळाने बाळाचं डायपर बदल रहा. तसंच ओलं डायपर जास्त वेळा ठेवू नका. तसंच बाळाची त्वचा स्वच्छ टिश्यूपेपरने साफ करा.

आणखी वाचा- थंडीत कशी घ्याल त्वचेची काळजी?

४. बाळाचे नाजूक ओठ –
हिवाळा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच ओठांची समस्या निर्माण होते. ओठ शुष्क होतात आणि त्यावरील त्वचा निघते. त्यातच लहान बाळांचे ओठ हे प्रचंड नाजूक असतात. त्यामुळे त्यांच्या ओठांवर थंडीचा लवकर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या ओठांना रोज घरी तयार केलेलं तूप किंवा दुधावरील साय लावावी.

५. मॉश्चरायझर –
बाळाच्या त्वचेत ओलावा राखण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने चांगल्या प्रतीचं मॉश्चरायझर लावावं.