News Flash

हे आहे मधुमेहींसाठी उपयुक्त आसन

नियमित केल्यास फायदेशीर

योग हा आरोग्यासाठी अतिशय आवश्यक व्यायामप्रकार आहे. नियमितपणे योगप्रशिक्षण घेतल्यास मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यात निश्चितच सुधारणा आढळून येते. विविध आसने केल्यामुळे शरीरातील यंत्रणा अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत होते. काही योगस्थितीमुळे (आसने) स्वादुपिंड ताणले जाते, यामुळे इन्शुलिनचे उत्पादन योग्य प्रमाणात होते, आणि यामुळे बेटा पेशींची निर्मितीही चांगली होते, तसेच वजन आणि मानसिक आरोग्यत संतुलन साधण्यास प्रोत्साहन मिळते. भुजंगासन हे मधुमेह झालेल्या व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त असे आसन आहे. हे आसन नियमित केल्यास त्याचे शरीराला नेमके कोणते फायदे होतात पाहूया…

असे करा आसन

१. पोटावर झोपावे आणि आपले कपाळ जमिनीवर टाकावे.

२. पाय एकत्रित ठेवावेत किंवा पायात अंतर असू द्यावे. शरीराचा छातीकडील भाग पाय जमिनीला समांतर ठेवत वर उचलावा.

३. आपले कोपरे शरीरालगत ठेवावेत, आणि हातांनी वरचा तोल सांभाळून ठेवावा.

४. आपले डोके वर उचलावे आणि अधिकाधिक मागे न्यावे. तसेच छाती शरीरापासून अधिकाधिक वर ताणावी. खांद्याचे स्नायू जास्तीत जास्त वाकवावेत, शक्य तेवढे एकमेकांजवळ येऊ द्यावेत. ही आसनाची पहिली पायरी आहे.

५. तीन ते पाच वेळा श्वाच्छोश्वास करेपर्यंत या अवस्थेत राहावे. हळूहळू श्वास सोडत जमिनीकडे यावे.

६. आसन सोडताना पाठीच्या स्नायूंना आराम द्यावा. पोट, बरगड्या, छाती आणि खांदे एकामागून एक पूर्वस्थितीत आणावेत.

आसन करताना या गोष्टी लक्षात घ्या

१. आसन करताना, किंवा आसनाच्या अंतिम स्थितीत असताना हातांचा आधार घेतला जातो किंवा श्वास रोखून धरला जातो. आणि ही कृती अजिबातच टाळू नये. श्वासोच्छ्वास नियमित असावा आणि आसन करताना पाठीला, मानेला आणि खांद्याला ताण बसायला हवा.

२. शरीर पटकन उचलू नये किंवा जोर लावूनही उचलू नये.

३. आसन करताना डोळे किंवा भुवया उंचावल्या जातात. यामुळे डोळ्यांमध्ये ताण निर्माण होतो. ही कृती टाळावी.

४. एकावेळेस ३ ते ५ वेळा आसन करावे, त्याहून जास्त करु नये.

५. योगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन मगच आसन करावे.

६. गर्भवती महिलांनी पोटाला ताण बसेल अशी कुठलीही कृती करू नये तसेच ज्यांना मधुमेहासोबत आरोग्याच्या इतर तक्रारी आहेत त्यांनीही हे आसन तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करु नये.

भुजंगासनाचे फायदे

१. पाठीच्या कण्यांवर ताण येतो त्यामुळे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. दीर्घकाळ काम केल्याने पाठीला लागलेली रग आणि दुखणे कमी करते

२. श्वसनविषयक आणि पचनप्रक्रियेत सुधारणा होतात. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी हे अतिशय उपयुक्त ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 11:30 am

Web Title: benefits of yoga bhujangasan for diabetic patients
Next Stories
1 ओएलएक्सप्रमाणे आता फेसबुकवरही करता येणार वस्तूंची खरेदी-विक्री
2 शूजमधून येणारी दुर्गंधी कशी घालवाल?
3 रक्तदाबाचा विकार आता १३०-८० पासूनच लागू
Just Now!
X