चारचाकी ही सध्या अनेकांसाठी गरजेची गोष्ट झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातही सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्ष यानिमित्ताने महिंद्रा कंपनीने ग्राहकांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये ग्राहकांना थोडीथोडकी नाही तर तब्बल १ लाखांपर्यंतची सूट मिळणार आहे. यातही आणखी एक भन्नाट गोष्ट म्हणजे एसयूव्हीच्या गाड्यांवर सर्वात जास्त सूट मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ही ऑफर स्टॉक संपेपर्यंत किंवा ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत असेल. यात Mahindra Marazzo, Mahindra Bolero, Mahindra TUV300, Mahindra TUV300 Plus, Mahindra KUV100 NXT, Mahindra XUV500, Mahindra Scorpio, Mahindra Alturas G4 या गाड्यांवर सूट मिळणार आहे. प्रत्येक गाडीवर वेगवेगळी सूट देण्यात आली आहे.

Mahindra Bolero: बोलेरो ही गाडी मजूबत, इकोनॉमिकल म्हणून ओळखली जाते. ही गाडी बाजारात आल्यापासून त्याला मोठी मागणी असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: ग्रामीण भागात हिला खूप मागणी आहे. महिंद्र डिलर्सवर स्टँडर्ड बोलेरोवर ५० हजारांपर्यंत तर पॉवर प्लसवर ग्राहकांना ४० हजारांपर्यंतची सूट मिळणार आहे.

Mahindra KUV100 NXT : KUV100 वर महिंद्राकडून ७९ हजारांपर्यंत सवलत दिली जात आहे. यात ४६ हजार रुपयांची रोख सूट असून २८,७५० रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. यासोबतच आणखी ४ हजारांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.

Mahindra Marazzo : ही महिंद्राची नवी गाडी आहे. भारतातील पहिली फोर-स्टार-रेटेड MPV गाडी आहे. ही गाडी एक्सचेंज केल्यास ग्राहकांना १५ हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात मिळणार आहे.

Mahindra TUV300: या गाडीवर सध्या ६५ हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच ४६ हजारांचे रोख डिस्काउंट देण्यात येत आहे. एक्सचेंज केल्यास १५ हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच ४ हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.

Mahindra Scorpio: वर्षानुवर्षे मागणी असलेली स्कोर्पिओ ही महिंद्राची SUV गाडी आहे. बाजारात या गाडीला खूप मागणी आहे. ही गाडी खरेदी केल्यानंतर ग्राहकांना महिंद्रा डिलर्सकडून ८५ हजारांपर्यंत सूट मिळणार आहे.

Mahindra TUV300 Plus: ही गाडी एसयूव्हीच्या जुन्या महिंद्रा स्कॉर्पिओची नवीन रिप्लेसमेंट मानली जात आहे. यात ७ सीटच्या एसव्हीयूवर ७० हजारांपर्यंत सूट दिली जात आहे.

Mahindra Alturas G4: महिंद्रा डिलर्सकडून या गाडीवर सर्वात जास्त म्हणजे १ लाखांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही गाडी नक्कीच एक उत्तम पर्याय आहे.