News Flash

ब्रोकोलीमुळे हृदयविकार, कर्करोगाला आळा

आपल्याला रोगप्रतिकारक औषधांची आवश्यकता आहे.

| June 28, 2016 02:32 am

ब्रोकोलीमुळे हृदयविकार, कर्करोगाला आळा

 

आठवडय़ातून किमान तीन ते चार वेळा बोक्रोली या भाजीचे सेवन केल्यास टाइप-टू मधुमेह, हृदयविकार, अस्थमा आणि कर्करोग यावर आळा घालता येतो, असे संशोधन अमेरिकी संशोधकांनी केले आहे.

संशोधकांनी हा दावा ब्रोकोलीच्या सेवनातून मिळणाऱ्या संयुगामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या नियंत्रण क्षमतेच्या आधारावर केला आहे. फोनोलिकच्या संयुगे ही हृदयाशी निगडित आजार, टाइप टू मधुमेह, अस्थमा आणि कर्करोगाचे विविध आजारांवर उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

फेनोलिक संयुगांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रमाणात निर्माण होत असून, सस्तन प्राण्यांना विविध समस्यांवर गुणकारक असल्याचे अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठाचे जॅक जुवीक यांनी म्हटले आहे.

आपल्याला रोगप्रतिकारक औषधांची आवश्यकता आहे, कारण त्यामुळे शरीराची होणारी झीज भरून निघते, शिवाय या संयुगाचे प्रमाण असलेल्या आहाराच्या सेवनामुळे यासारख्या विविध आजारांपासून बचावदेखील होत असल्याचे जॅक यांचे म्हणणे आहे. यासाठी संशोधकांनी अनुवांशिक तंत्रज्ञान म्हणजेच संख्यात्मक विशेष गुणाची विश्वसनीय पद्धत आहे.

संशोधकांच्या मते, या संयुगांमध्ये आढळणारे हे अंश ब्रोकोली (कोबीसारखा एक प्रकार) आणि त्यासारख्या भाज्या  काळे  आणि कोबीच्या सेवनातून मिळत आल्याचे सिद्ध झाले आहे. या भाज्यांच्या सेवनातून शरीरात या संयुगाची मात्रा सर्वत्र आढळते, जे शरीराला हितकारक आहे. तसेच हे हितकारक अंश दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी किमान तीन ते चार आठवडय़ांनी ब्रोकिोलीसारख्या भाज्यांचे सेवन आवश्यक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 2:32 am

Web Title: broccoli prevent heart disease and cancer
Next Stories
1 नैराश्य कमी करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात राहा!
2 तिळाचे तेल मधुमेहींसाठी उपयुक्त
3 फॅशनबाजार  : पावसाळी पोशाख..!
Just Now!
X