सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक दमदार प्लॅन आणला आहे. कंपनीने आपल्या 1,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केला असून याची वैधता 60 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता या प्लॅनमध्ये 365 दिवसांऐवजी 425 दिवसांची बंपर व्हॅलिडिटी मिळेल.

या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 1275GB डेटा मिळतो. याशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल, दररोज 100 एसएमएस मिळतील. BSNL ट्युन्स आणि बीएसएनएल टीव्हीचाही फ्री अ‍ॅक्सेस मिळेल. 60 दिवसांची अतिरिक्त वैधतेची ऑफर 25 डिसेंबर ते 31 जानेवारी 2020 पर्यंत सर्व सर्कल्समध्ये लागू असेल.

दोन दिवसांपूर्वीच कंपनीने आपल्या BSNL Sixer plan अर्थात 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केलेत. आतापर्यंत या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळायचा. पण, आता कंपनीने त्यात वाढ केली असून अतिरिक्त डेटा ऑफर अंतर्गत दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा ऑफर अंतर्गत दररोज 3 जीबी डेटा ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. 31 डिसेंबरनंतर मात्र ग्राहकांना पुन्हा 2जीबी प्रतिदिन डेटा मिळेल. यानुसार, 134 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज तीन जीबी डेटाशिवाय ग्राहकांना मोफत व्हॉइस कॉलिंग (250 मिनिट रोज लिमिट) आणि 100 एसएमएस दररोज मिळतील.