सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL ने नुकत्याच आपल्या नवीन प्लॅनची घोषणा केली आहे. २९९ रुपयांच्या या प्लॅनला कंपनीने BB BSNL CUL असे नाव दिले आहे. या प्लॅनमधून ग्राहकांना 8 Mbps स्पीडने डेटा मिळू शकणार आहे. यामध्ये रोज १.५ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. भारतातील सर्व सर्कलमध्ये हा प्लॅन लागू होणार असून त्याची वैधता ३० दिवसांची असेल असे सांगण्यात आले आहे. इंटरनेट सुविधेबरोबरच कंपनीने कॉलिंगसाठीही अतिशय उत्तम अशा सुविधा देण्यात येणार आहेत. यामध्ये बीएसएनएलच्या नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग करता येणार आहे. तर इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३०० मिनिटे मोफत मिळणार आहेत.

रात्रीच्या वेळी आणि रविवारी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. इतर नेटवर्कवरीवल कॉलिंगसाठी देण्यात आलेले ३०० मिनिटे सोमवार ते शुक्रवार सकाळी ६ ते रात्री १०.३० या वेळासाठी देण्यात आले आहेत. त्यानंतर इतर वेळात तुम्ही अनलिमिटेड कॉलिंग करु शकाल. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतची घोषणा केली असून बीएसएनएलच्या वेबसाईटवर जाऊनही तुम्हाला याची माहिती मिळू शकणार आहे. याशिवाय कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी ३९९ रुपयांच्या आणखी एका प्लॅनची घोषणा केली आहे. ७४ दिवसांच्या व्हॅलिडीटीसह ग्राहकांना या प्लॅनमध्ये रोज ३.२१ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजे या प्लॅनमध्ये एकूण २३७.५४ जीबी डेटा मिळणार आहे.