BSNLच्या (भारत संचार निगम लिमिटेड) ग्राहकांसाठी एक आंनदवार्ता आहे. कंपनीने आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना तब्बल चार महिन्याची मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या दमदार ऑफरचा फायदा भारत फायबर ब्रॉडबँड ग्राहकांसोबत लँडलाइन ब्रॉडबँड आणि Wi-Fi Max ब्रॉडबँड ग्राहकांना देण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे, या ऑफरचा लाभ फक्त तेच ग्राहक घेऊ शकतात जे बीएसएनएलच्या ३६ महिन्याचा एखाद्या प्लॅन सब्सक्राइब कंपनीकडे दुसरेही अनेक टर्म प्लान आहेत. पण त्यामध्ये चार महिन्याची सर्विस मोफत दिली जात नाही.

या प्लॅनमध्येही मिळणार मोफत सर्विस –
बीएसएनएल भारत फायबर ब्रॉडबँड आणि दुसऱ्या ब्रॉडबँड कनेक्शनसोबत एकापेक्षा जास्त लाँग टर्म प्लान ऑफर करत आहे. या प्लानमध्ये इतरही अनेक फायदे आहेत. १२ महिन्याच्या प्लॅन घेतल्यास एक महिन्याची सर्विस मोफत दिली जाईल. त्याशिवाय २४ महिन्याच्या मोफत प्लॅनमध्ये तीन महिन्याची सर्विस मोफत दिली जाईल. तर ३६ महिन्याचा प्लॅन घेतल्या चार महिन्याची मोफत सेवा दिली जाणार आहे.

३६ महिन्याच्या प्लॅनमध्ये काय काय मोफत मिळणार –
भारत फायबर ब्रॉडबँड कनेक्शन घेतल्यास तुम्हाला अमर्याद मोफत कॉलिंग मिळणार आहे. तसेच FUP लिमिटपर्यंत अमर्याद डाउनलोडिंगचा स्पीडही ऑफर केला जात आहे.

सर्कलनुसार प्लॅन आणि मोबदल्यात फरक –
कोणत्या प्लॅनमध्ये किती डेटा मिळेल ते प्लॅनच्या किंमतीवर अवलंबून आहे. बीएसएनएल वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळे प्लॅन ऑफर करत आहे. अशातच या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सुविधा आणि किंमतीमध्ये फरक दिसून येतो. कंपनी आपल्या दुसऱ्या प्लॅनमध्येही अनेक सुविधा देत आहे.

वार्षिक प्लॅनमध्ये काय काय ?

बीएसएनएलच्या वार्षिक प्लॅनमध्ये ग्राहकांना अॅमेझॉनचं प्राइम मेंबरशिप मोफत मिळत होती. ही ऑफर सध्या बंद करण्यात आली आहे. कंपनीने २३ मे पासून नवीन ऑफर दिली आहे. त्यामध्ये वार्षिक मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना ९९ रूपयांच्या मासिक ईएमआयवर गूगल नेस्ट मिनी आणि १९९ रूपयांच्या ईएमएआयवर गूगल नेस्ट हब ऑफर करण्यात आलं आहे.