29 September 2020

News Flash

Realme चा स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, किंमत ९ हजारांपेक्षाही कमी

परवडणाऱ्या किंमतीमध्ये दमदार फीचर्स, सेलमध्ये मिळतील आकर्षक ऑफरही...

गेल्या महिन्यात Realme कंपनीने भारतामध्ये आपल्या नवीन Narzo सीरिजचे Narzo 10 आणि Narzo 10A हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. हे दोन्ही स्मार्टफोन मिडरेंज आणि बजेट सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत. या दोन स्मार्टफोनद्वारे परवडणाऱ्या किंमतीमध्ये दमदार फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. यातील Narzo 10A या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी आज(दि.12) खास सेलचं आयोजन करण्यात आलं आहे.

फिल्पकार्ट आणि Realme.com वर हा फोन दुपारी 12 वाजेपासून सेलमध्ये उपलब्ध असेल. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. यामध्ये ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच, ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’वरही 5 टक्के डिस्काउंट मिळेल. याशिवाय नो-कॉस्ट इएमआयचा पर्यायही आहे.

Realme Narzo 10A ची किंमत :- 
Realme Narzo 10A हा स्मार्टफोन कंपनीने एकाच व्हेरिअंटमध्ये लॉन्च केला आहे. याच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,499 रुपये आहे. Realme Narzo 10A स्मार्टफोन ब्लू आणि व्हाइट अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल.

Realme Narzo 10A स्पेसिफिकेशन्स:-
रिअलमी Narzo 10A मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले आणि MediaTek Helio G70 चिपसेट आहे. या फोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. मिनी-ड्रॉप फुलस्क्रीन असलेल्या या फोनमध्ये हाय ग्राफिक PUBG खेळता येईल. स्टोरेज वाढवण्यासाठी फोनला मेमरी कार्डचा सपोर्टही आहे. तर, 5000mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीमुळे 43 तासांपेक्षा अधिक टॉकटाइम मिळेल असा कंपनीचा दावा आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनचा मुख्य कॅमेरा 12 मेगापिक्सलचा तर अन्य दोन कॅमेरे अनुक्रमे 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. कॅमेऱ्यात अल्ट्रा मॅक्रो, पोर्टेट मोड आणि एचडीआर मोडशिवाय 4x झूम हे फीचर्स मिळतील. सेल्फीसाठी या फोनमध्ये AI सपोर्टसह 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 12:01 pm

Web Title: budget phone realme narzo 10a will be up for sale in india today get price offers specifications and all other details sas 89
Next Stories
1 किंमत ९ हजारांहून कमी, ‘या’ दिवशी पुन्हा आहे ‘स्वस्त’ स्मार्टफोनचा सेल
2 Xiaomi ने भारतात लाँच केले दोन शानदार लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3 दोन वर्षांच्या शोधानंतर आनंद महिंद्रांनी केली ‘या’ स्टार्टअपमध्ये १ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
Just Now!
X