सणावारांच्या निमित्ताने वेगवेगळ्या कंपन्या आपल्या ग्राहकांना सूट देऊन खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये मोबाईल कंपन्या सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यातही तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण नवरात्र आणि दिवाळीच्या मुहूर्तावर अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर आणि पेटीएम वापरल्यास आयफोनवर अतिशय आकर्षक सूट मिळणार आहे. जुनेच नाही तर नव्याने लाँच झालेल्या iPhone XS आणि iPhone XS Plus वरही धमाकेदार ऑफर मिळणार आहे. या ऑफर्स पाहून तुम्हाला नक्कीच आयफोन खरेदी करण्याची इच्छा होईल.

iPhone SE – १४,४०० रुपयांना 

हा फोन २६,००० ला आहे. त्यावर फ्लिपकार्टवर १०,००१ रुपयांची सूट मिळणार आहे. हा फोन एचडीएफसी कंपनीचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड खरेदी करुन घेतला तर त्यावर जास्तीचे १० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. या सगळ्या ऑफर्स मिळाल्यानंतर हा फोन १४,४०० रुपयांना मिळू शकतो. त्यामुळे स्वस्तात मस्त असा हा उत्तम पर्याय ठरु शकतो.

iPhone 8 – ४५,३३० 

या फोनवर पेटीएम मॉलवर ऑफर आहे. हा फोन ५९,९०० रुपयांना असून त्यावर थेट १३,५०० रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच हा फोन खरेदी करताना आयसीआयसीआय बँकेचे कार्ड वापरल्यास त्यावर आणखी डिस्काऊंट मिळणार आहे. तुम्हाला पेटीएम वॉलेटचा उपयोग करायचा नसेल तर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन यावरही उत्तम डिस्काऊंट ऑफर देण्यात आल्या आहेत.

iPhone X – ६४,९९९

तुम्हाला iPhone XS वर पैसे खर्च करायचे नसतील तर हा फोन उत्तम पर्याय आहे. हा फोन मागील वर्षी लाँच झाला होता आणि ग्राहकांकडून त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. आता या फोनची किंमत ९१,९०० असून फ्लिपकार्टवर थेट २१,९०१ रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच तुम्ही एचडीएफसीचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास तुम्हाला १० टक्के डिस्काऊंट आणि एचडीएफसीकडून कर्ज घेतल्यास ईएमआयवर २,५०० रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे हा फोन ६४,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.

iPhone 8 Plus – ५८,२२१

या फोनवर पेटीएम मॉलवर ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये १३,५०० रुपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरही ऑफर देण्यात आल्या आहेत मात्र पेटीएमवर हा फोन सर्वात कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. ही कॅशबॅक २४ तासात तुमच्या अकाऊंटला जमा होईल.
iPhone XS आणि iPhone XS Max – १२,००० कॅशबॅक
पेटीएमच्या माध्यमातून आयफोन खरेदी केल्यास आकर्षक ऑफर देण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही फोनचे व्हेरियंट कमी किमतीत मिळणार आहेत.

iPhone XS 64GB : ८७,९००
iPhone XS 256GB: १,०२,९००
iPhone XS 512GB: १,२२,९००
iPhone XS Max 64GB: ९७,९००
iPhone XS Max 256GB: १,१२,९००
iPhone XS Max 512GB: १,३२,९००