News Flash

फेसबुक आणि इन्स्टाग्राममधील हे नवीन बदल तुमच्या लक्षात आलेत?

सोशल मीडियाचा वापर होतोय सुलभ

संग्रहित छायाचित्र

फेसबुक आपल्या होमस्क्रीनमध्ये सातत्याने बदल करत असते. यूजर्सना वेबसाईटचा वापर सोपा व्हावा यासाठी कंपनीतर्फे सातत्याने नवनवीन बदल करण्यात येतात. आता करण्यात आलेल्या नवीन बदलामुळे फेसबुकवरील पोस्ट वाचणे अधिक सोपे होणार आहे.

नव्या बदलामुळे एखाद्याच्या पोस्टवर आपल्याला कमेंट करायची असल्यास आपण ती सहज करु शकतो. याशिवाय इतरांनी केलेल्या कमेंटही आपल्याला दिसू शकतील. नवीन कमेंटबॉक्स हा फेसबुक मेसेंजर बॉक्ससारखा दिसत आहे त्याचप्रमाणे यातील रंगवैविध्यामुळे तो आणखी आकर्षक दिसत आहे. याशिवाय लाईक्स, शेअर हे पर्याय देखील मोठे करण्यात आले आहेत. कमेंटमध्ये असणाऱ्या फोटोंचा आकारही बदलण्यात आल्याने ते अधिक चांगल्या पद्धतीने दिसू शकतात.

फेसबुकचेच फोटो शेअर अॅप असणाऱ्या इन्स्टाग्रामवरही काही बदल करण्यात आले आहेत. इन्स्टाग्रामवरील मेसेज आणि कमेंट या दोन ठिकाणी हे बदल करण्यात आले हाते. मात्र इन्स्टाग्राममध्ये झालेले हे बदल अॅप्लिकेशनच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये युजर्सना दिसतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 6:33 pm

Web Title: changes in facebook instagram for easy use
Next Stories
1 लठ्ठपणा दूर करण्यासाठी ‘ही’ आसने फायदेशीर!
2 ‘या’ गोष्टींमुळे तुमच्या डोळ्याखाली येतात काळी वर्तुळं
3 स्नायूंची ताकद वाढवायची आहे? झोपण्यापूर्वी खा ‘हे’ पदार्थ
Just Now!
X