News Flash

तुमच्या मोबाइलने धोक्याची पातळी तर ओलांडली नाही ना?

अशी तपासा रेडिएशन लेवल

मोबाईल म्हणजे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. या उपकरणाचे आपल्याला इतके व्यसन लागले आहे की मोबाईल थोडा वेळ जरी हातात नसला तरी आपल्याला सुधरत नाही. जास्त प्रमाणात मोबाईल वापरणे आरोग्यासाठी धोकादायक असते हे आपल्याला माहित आहे. त्यामुले मोबाईल वापरत असताना त्याच्या सुरक्षेबाबतही सतर्क असणे गरजेचे आहे. चांगल्या कंपनीच्या, महागडया मोबाईल मध्येही आग लागणे, बॅटरी फुटणे यांसारखे प्रकार आपल्या कानावर पडत असतात. इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने याबाबत विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. रेडिएशन ही मोबाईलमध्ये महत्त्वाची समजली जाणारी गोष्ट असून त्याबाबत आपल्याला योग्य ती माहिती असणे गरजेचे आहे. आता मोबाईलमधील ही रेडिएशन लेवल कशी तपासायची असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल. तर ते अगदी सोपे आहे. काही सोप्या टप्प्यांनी हे अगदी सहज साध्य करता येते.

१. तुमच्या मोबाईलमध्ये *#07# डायल करा.

२. यामध्ये SAR रिपोर्ट दिसेल.

३. त्यात India SAR limit दिलेले असते. ते प्रत्येक किलोला १.६ वॅटहून कमी असावे असे संकेत आहेत.

४. अशाप्रकारे तुम्ही आपल्या फोनची रेडिएशन लेवल तपासू शकता.

५. त्यामुळे तुमच्या फोनची SAR level १.६ हून जास्त असेल तर तुमचा फोन धोकादायक आहे हे लक्षात घ्यायला हवे. अशावेळी फोन बदलणे आवश्यक आहे.

बाजारातील काही प्रसिद्ध स्मार्टफोनची SAR level

iPhone 6 : प्रत्येक किलोला १.५९ वॅटहून कमी

LG G3 : प्रत्येक किलोला ०.९९ वॅटहून कमी

LG G2 : प्रत्येक किलोला १.४४ वॅटहून कमी

Samsung Galaxy Note 2 : प्रत्येक किलोला ०.४२ वॅटहून कमी

Samsung Galaxy Note 3 : प्रत्येक किलोला १.५९ वॅटहून कमी

Samsung Galaxy Note 4 : प्रत्येक किलोला १.२० वॅटहून कमी

Samsung Galaxy S5 : प्रत्येक किलोला १.२८ वॅटहून कमी

HTC One (M8) : प्रत्येक किलोला १.२९ वॅटहून कमी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 2:19 pm

Web Title: check radiation level of your smartphone by sar by ussd code
Next Stories
1 APPLE चा सर्वात स्वस्त iPad लॉंच, 10 तासांचा तगडा बॅटरी बॅकअप
2 तुमचं आधार भलतीच व्यक्ती वापरत नाहीये ना? असं तपासा
3 मोबाइलवर आधारित एलिसा रक्तचाचणी विकसित
Just Now!
X