News Flash

सतत टीव्ही बघण्याने डोळे, मेंदूवर परिणाम

लहान मुले सतत दूरदर्शन संचापुढे बसून त्यावरील कार्यक्रम बघत असतात. त्यामुळे त्यांना इतर कशाचेही भान राहात नाही. दूरदर्शनमुळे तर अभ्यासाकडेही दुर्लक्ष होत आहे.

| November 22, 2013 08:35 am

नेत्रतज्ज्ञ व मानसोपचार तज्ज्ञांचा इशारा; लहान मुलांना विविध आजाराची शक्यता
जागतिक दूरदर्शन दिन
लहान मुले सतत दूरदर्शन संचापुढे बसून त्यावरील कार्यक्रम बघत असतात. त्यामुळे त्यांना इतर कशाचेही भान राहात नाही. दूरदर्शनमुळे तर अभ्यासाकडेही दुर्लक्ष होत आहे. सतत दूरदर्शन बघितल्याने त्याचा डोळ्यावर आणि मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांना फार वेळ दूरदर्शन बघू देऊ नका, असा सल्ला शहरातील नेत्रतज्ज्ञ व मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.
दूरदर्शनवर सतत चोवीस तास कार्यक्रम सुरू असतात. लहान मुलांसाठी तर विविध वाहिन्याच आहेत. या वाहिन्यावरील विविध कार्यक्रम बघताना लहान मुलांना तर कशाचेही भान राहात नाही. आईवडिलांनी केलेल्या सूचनांकडेही ते दुर्लक्ष करतात. परंतु हे दुर्लक्ष मुलांच्या बाबतीत हानीकारक ठरू शकते. सतत दूरदर्शनवरील कार्यक्रम बघितल्याने मुलांना विविध आजारही होऊ शकतात, असे एका संशोधनातून पुढे आले आहे. सतत एकाच पद्धतीचे दृष्य बघण्याने मेंदूवर परिणाम होतो. हिंसात्मक दृष्य बघितल्याने मुले हिंसात्मक वृत्तीची बनतात. त्यातच विविध कार्यक्रम दूरदर्शच्या अगदी जवळून बघण्याची मुलांना सवय झाली आहे.
जवळून बघण्यामुळे सर्वाधिक डोळ्यांवर परिणाम होतो. डोळे शुष्क होतात. डोळ्यात जळजळ होते. डोळ्यांच्या मांसपेशीवर ताण पडतो. डोळ्यांच्या मांसपेशी मृत पावण्याची भीती असते. तसेच दूरदर्शनच्या पडद्यावरून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे डोकेदुखी वाढते. पालकांसोबत लहान मुलांचे दूरदर्शन बघण्याचे प्रमाण हे ८० टक्के आहेत. सासू-सुनेच्या मालिकांचा प्रभाव त्यांच्या मुलींवर होत असल्याचे दिसून येत आहे. लहान मुले रडली की त्यांना दूरदर्शनच्या पडद्यावरील कार्टून दाखवण्याचा प्रकारही काही पालक करतात. हा प्रकार अत्यंत घातक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. दरवर्षी २१ नोव्हेंबरला जागतिक दूरदर्शन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त दूरदर्शनच्या लाभासोबतच त्याचे तोटेही सामोर येतात.
दूरदर्शन बघण्यास मुलांना मनाई करू नये.सध्या दूरदर्शन हे ज्ञानकेंद्र झाले आहे. पण काय बघावे आणि काय बघू नये आणि किती वेळ कोणता कार्यक्रम बघू द्यावा, याचे भानही पालकांनी ठेवणे आवश्यक आहे. दररोज सतत एक तासाच्या वर तसेच आठवडय़ातून एक दिवस अडीच ते तीन तासाच्या वर दूरदर्शनवरील कार्यक्रम बघू नये, असे संशोधनही पुढे आले आहे. परंतु काही लहान मुले पाच-पाच तास दूरदर्शनच बघत असतात. ही सवय निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने व सामाजिक दृष्टीनेही वाईटच आहे. दूरदर्शनमुळे मुलांचे मैदानातील खेळ कमी झाले आहेत. लहान मुलांना घरातील बैठे खेळ
खेळण्यास द्यावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 8:35 am

Web Title: constantly watching tv it affect brain and eyes
टॅग : Lifestyle
Next Stories
1 थंडीतली फॅशन!
2 कमी झोपेमुळे कुमारवयीन मुले पडतात आजारी!
3 जाड शरीरयष्टीच्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक
Just Now!
X