21 January 2021

News Flash

गुगल मॅप्समध्ये नवीन फीचर, करोनाच्या संसर्गापासून वाचण्यास होणार मदत

गुगलकडून अपडेट रोलआउट करण्यास सुरूवात...

करोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी गुगलने आपल्या मॅप्स सर्व्हिसमध्ये एक खास फीचर अॅड केलं आहे. Google Maps मधील हे नवीन फीचर युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीकडून अपडेट रोलआउट करण्यास सुरूवात झाली आहे.

नव्या अपडेटच्या मदतीने युजर प्रवासाआधी स्टेशनवरील गर्दीबाबत माहिती घेऊन आपल्या प्रवासाच्या योजनेत बदल करु शकतात, असे गुगलने म्हटले आहे. यामुळे करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यास मोठी मदत होईल असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सोमवारी एका ब्लॉग पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. यामुळे युजर्सना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे जाण्यास मदत होईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले. हे नवे फीचर अँड्रॉइड आणि iOS दोन्हीसाठी रोलआउट केले जात आहे. यामध्ये युजर्सना टेस्ट सेंटर लोकेशन आणि कोविड-19 बॉर्डर चेक्सबाबत माहिती मिळेल. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या ठिकाणी जाण्याआधी त्या ठिकाणी किती गर्दी आहे, याबाबत माहिती घेणं आवश्यक आहे. जर याची माहिती स्मार्टफोन अॅपद्वारे मिळाली तर करोनाच्या संसर्गापासून स्वतःला काही प्रमाणात तरी वाचवता येऊ शकतं, असं कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

गुगलचं हे फीचर भारतासह अर्जेंटीना, फ्रान्स, नेदरलैंड्स, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये रोलआउट केलं जाणार आहे. जगातील अन्य देशांमध्येही हे फीचर रोलआउट करणार की नाही याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 2:45 pm

Web Title: coronavirus related features in google maps sas 89
Next Stories
1 ट्विटरचं नवीन फिचर ‘फ्लीट्स’; २४ तासांत गायब होणार पोस्ट
2 Xiaomi च्या शानदार स्मार्टफोनचा पुन्हा ‘सेल’, मिळेल Airtel ‘डबल डेटा’चा फायदा
3 गृहिणींना घरच्या घरी करता येतील अशी सहजसोपी योगासने
Just Now!
X