News Flash

एटीएम कार्डची डेटा चोरी रोखण्यासाठी ‘हे’ करा

सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम सेंटरमध्ये स्कीमरच्या माध्यमातून चोरी

( संग्रहीत छायाचित्र )

आपल्यातील अनेकजण सध्या स्वत:जवळ रोख बाळगण्यापेक्षा लागेल तेव्हा एटीएममधून पैसे काढणे पसंत करतात. नोटाबंदीनंतर ई-व्यवहारांना चालना मिळाली, त्यामुळे एटीएमचा वापरही वाढल्याचे आपल्याला दिसते. आता एटीएम मशीन चोरीला जाणे, एटीएम मशीन हॅक होणे अशा गोष्टी आपण अनेकदा ऐकतो. त्याबरोबरच आपल्या एटीएम कार्डच्या माहितीची चोरी होणे हेही प्रकार बऱ्याचदा पहायला मिळतात. नुकत्याच काही लोकांच्या अकाऊंटमधून एटीएम मशीनमधून लाखो रुपये काढल्याच्या तक्रारीही दाखल झाल्या आहेत. आता एटीएम कार्ड खातेधारकाकडे असताना चोरांनी एटीएममधून पैसे कसे काढले असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो. याबाबत पोलिस, बँकेचे लोक आणि सायबर सेल यंत्रणेने तपासणी केल्यानंतर चोरांनी एटीएम सेंटरमध्ये स्कीमर लावून चोरी केल्याचे लक्षात आले. या स्कीमरद्वारे डेबिट कार्डचा डेटा कॉपी केला गेला.

आता हा स्कीमर चोरांनी कसा लावला? तर ज्या एटीएममध्ये सुरक्षारक्षक नाहीत अशी एटीएम सेंटर निवडून त्यांनी त्याठिकाणी ही यंत्रणा बसवली. हा स्कीमर नेमका कसा काम करतो आणि त्यामुळे आपल्या एटीएमची माहिती कशापद्धतीने चोरली जाते पाहूयात…

१. या स्कीमरची किंमत ७ हजार रुपयांच्या आसपास असते. ई-कॉमर्स वेबसाईटवर याची खरेदी करता येते. चोरी करणारे हे लोक बँकेचा लोगो असलेले कार्ड जसेच्या तसे बनवू शकत नाहीत. अशावेळी स्कीमरवर कॉपी झालेला डेटा एका कोऱ्या कार्डवरील मॅग्नेटीक स्ट्रीपवर कॉपी कार्ड मशीनद्वारे सेव्ह केला जातो.

२. जेव्हा आपण पैसे काढण्यासाठी कार्ड स्वॅप करतो तेव्हा त्यावरील डेटा कॉपी करुन घेतला जातो. याबरोबरच लपवलेल्या कॅमेराच्या माध्यमातून आपला पिन नंबरही रेकॉर्ड केला जातो. या दोन्हीचा वापर करुन चोर कोणत्याही एटीएममधून आपल्या अकाऊंटमधून पैसे काढू शकतात.

३. सध्या देशातील अनेक एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक नाहीत. तसेच याठिकाणी सीसीटीव्हीही उपलब्ध नाहीत, असतील तरीही ते चालू स्थितीत नाहीत. पोलिसांनी केलेल्या पाहणीत त्यांना सुरक्षारक्षक नसलेल्या ठिकाणी हे प्रकार जास्त होत असल्याचे लक्षात आले आहे.

४. सायबर सेलच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारच्या चोरीमध्ये स्थानिक चोरांचा समावेश असतो. हळूहळू डेटा मिळवत हे लोक एटीएमकार्ड तयार करतात आणि त्याद्वारे पैसे चोरी करतात. पोलिसांना असे काही मोबाईल क्रमांक मिळाले आहेत. ज्यांच्यामार्फत पोलिस या गँगमधील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय काळजी घ्याल?

१. एटीएममधून पैसे काढताना या एटीएममध्ये स्कीमर तर लावला नाही ना याची खात्री करुन घ्या.

२. या स्कीमरची डिझाईन अशी असते जी आपल्याला मशीनचाच एक भाग वाटते. त्यामुळे पैसे काढण्यापूर्वी मशीनकडे बारकाईने पाहा. पाहून लक्षात आले नाही तर हात लावून पाहा.

३. शक्य तितक्या वेळा आपल्या एटीएमचा पिन नंबर बदलत राहा. त्यामुळे अशाप्रकारच्या चोरीपासून तुम्ही स्वत:चे संरक्षण करु शकाल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 1:04 pm

Web Title: cyber fraud by using your debit atm card tips for how to take care
Next Stories
1 स्ट्रॉ
2 नॅनोकण तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिओचे एकच इंजेक्शन
3 भारतीय लष्करासाठी टाटा मोटर्सची जबरदस्त सफारी स्टॉर्म कार
Just Now!
X