इंटरनेटवर उपलब्ध असणारे मार्गदर्शन अ‍ॅप आणि माहिती नैराश्याविरोधात परिणामकारक ठरू शकते, असे वैज्ञानिकांना आढळून आले आहे.

अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातील संशोधकांनी अशा ४,७८१ जणांना सहभाग असलेल्या २१ अभ्यासांचे समालोचन केले. मागील काही वर्षांमध्ये अनेक अ‍ॅप आणि संकेतस्थळांनी नैराश्यावर उपचार केले जात असल्याचा दावा केला आहे.

Low back pain: How to fix your posture and straighten your spine
Low back pain: पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? चिंता करु नका! डॉक्टरांनी सांगितले सोपे उपाय
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू

हा अभ्यास संज्ञानात्मक वर्तनासंबंधी समुपदेशन प्रदान करणाऱ्या अ‍ॅपवर केंद्रित केला असून जर्नल ऑफ मेडिकल इंटरनेट रिसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही मनोचिकित्सा नैराश्य आणि इतर मानसिक विकारांची लक्षणे कमी करण्यासाठी विचार पद्धती आणि वागणूक बदलण्याकडे लक्ष केंद्रित करते. यापूर्वीच्या अभ्यासात विविध प्रकारे संज्ञानात्मक वर्तणुकीबाबत समुपदेशन देणाऱ्या अ‍ॅपचा समावेश होता.

या अभ्यासात तीव्र नैराश्य, आणि चिंता, अति मद्यपान अशा समस्या असणाऱ्यांवरही या अ‍ॅपच्या समुपदेशनाचा काय परिणाम झाला याचे विश्लेषण करण्यात आले. यापूर्वीचे अभ्यास सौम्य नैराश्य आणि इतर कोणत्याही प्रकारच्या मानसिक समस्या नसणाऱ्यांवर केंद्रित केल्या असाव्यात अशी माझी धारणा होती, परंतु असे नसून अशा प्रकारच्या अ‍ॅपमुळे अनेक लोकांना मदत होऊ शकते, असे  लोरेंजो-लुईस यांनी सांगितले. अशा प्रकारचे अ‍ॅप नैराश्याने पीडित असणाऱ्या लोकांवर उपचार करण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरू शकतात.

याचा अर्थ असा नाही की नैराश्यग्रस्तांनी त्यांचे औषधोपचार बंद करून अ‍ॅपवर समुपदेशन घेण्यास सुरुवात करावी. प्रत्यक्ष मिळणारे समुपदेशन आणि औषधे अशा प्रकारच्या अ‍ॅपपेक्षा अधिक प्रभावशाली ठरू शकतात, असे लोरेंजो-लुईस यांनी सांगितले.