News Flash

मारुतीच्या ‘प्रीमियम’ कार्सवर 1 लाखापर्यंत घसघशीत सूट

अपेक्षेपेक्षा कमी विक्री झाल्यामुळे कंपन्यांकडे गेल्या वर्षीचा स्टॉक अद्यापही पडून

देशातील लोकप्रिय कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीच्या प्रीमियम कार्सच्या खरेदीवर घसघशीत सूट दिली जात आहे. वर्ष 2018 मध्ये अपेक्षेपेक्षा कमी विक्री झाल्यामुळे अनेक कंपन्यांकडे गेल्या वर्षीचा स्टॉक अद्यापही पडून आहे, याच कारणामुळे नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यातही अनेक कार कंपन्यांच्या वाहनांवर सवलत दिली जात आहे. मारुती सुझुकी आपल्या प्रीमियम डिलरशीप नेक्साच्या कारवर शानदार ऑफर देत आहे. या कारवर 1 लाखांपर्यंत सवलत दिली जात आहे.

पाहुयात मारुतीच्या कोणत्या कारवर किती सूट –

मारुती इग्निस –
या कारवर 85,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळवू शकतात. इग्निसच्या ऑटोमॅटिक व्हेरिअंटवर 85,000 आणि मॅन्युअल व्हेरिअंटवर 75,000 रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. यामध्ये 15 हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनसशिवाय कॅश डिस्काउंट आणि कॉर्पोरेट डिस्काउंट अशा ऑफर्सचाही समावेश आहे. मारुती इग्निसमध्ये 1.2-लिटरचं पेट्रोल इंजिन आहे, हे इंजिन 83hp पावर आणि 113Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनचा पर्यायही आहे.

मारुती एस-क्रॉस –
मारुतीच्या या प्रीमियम कारवर 95 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 75 हजार रुपयांपर्यंत कॅश आणि कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल. याशिवाय 25 हजार रुपये एक्सचेंज बोनस डिस्काउंटचाही समावेश आहे. या कारमध्ये 1.3 लिटरचं डिझेल इंजिन असून हे इंजिन 90hp पावर आणि 200Nm टॉर्क जनरेट करतं.

मारुती सियाझ –
मारुती सुझुकीच्या प्रीमियम सिडान सियाझवर एक लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतं. यामध्ये 25 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि कॅश व कॉर्पोरेट डिस्काउंटचाही समावेश आहे. या कारमध्ये 1.5-लिटरचं पेट्रोल आणि 1.3-लिटरचं डिझेल इंजिन आहे.

कोणत्या कारवर सर्वाधिक सवलत मिळू शकते याबाबतच्या माहितीसाठी तुम्ही जवळच्या नेक्सा डिलरशिपमध्ये संपर्क करु शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 2:57 pm

Web Title: discounts on maruti suzuki ciaz ignis s cross
Next Stories
1 जीवन विमा खरेदी करताय? या गोष्टी लक्षात ठेवा
2 ‘आयुष्मान भारत’मध्ये खासगी सहभाग वाढवणार
3 देशातील आरोग्य क्षेत्रातील संशोधनात गुंतवणुकीची गरज
Just Now!
X