12 December 2019

News Flash

जास्त पिकलेल्या केळ्यांचे काय करावे समजत नाही? करून पाहा बनाना-चॉकलेट कपकेक

अनेकांच्या घरी अनेकवेळा केळी आणली जातात. बऱ्याचवेळेस घरी येणारे पाहुणेदेखील खाऊ म्हणून केळी घेऊन येतात. सणावारी तर ती आवश्यकच असतात.

| August 1, 2014 03:31 am

अनेकांच्या घरी अनेकवेळा केळी आणली जातात. बऱ्याचवेळेस घरी येणारे पाहुणेदेखील खाऊ म्हणून केळी घेऊन येतात. सणावारी तर ती आवश्यकच असतात. परंतु, अनेकप्रसंगी बरीचशी केळी शिल्लक राहतात आणि मग ह्या जास्त पिकलेल्या केळ्यांचे काय करावे हे समजत नाही. अशावेळी तुम्ही इथे दिलेल्या पाककृतीप्रमाणे ‘बनाना-चॉकलेट कपकेक’ तयार करू शकता, जे निश्चितच सर्वांना आवडतील. तर जाणून घ्या ‘बनाना-चॉकलेट कपकेक’ची पाककृती आणि त्यासाठी लागणारे साहित्य.

बनाना अॅण्ड चॉकलेट कपकेक
तयार करण्यासाठी लागणारा वेळ – १० मिनिट, बेकींगसाठीचा कालावधी – २० मिनिट, १८ कपकेक तयार होतात

साहित्य – ३ जास्त पिकलेली केळी, अर्धा कप वितळलेले बटर, अर्धा कप पिठी साखर, १ चमचा व्हेनिला इसेन्स, २ कप मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, २ अंडी, ४ चमचे दूध आणि अर्धा कप चॉकलेट चिप्स

कृती – ओव्हन २२० C तापमानाला प्रिहिट करावा. केळ्यांची साल काढून चांगले कुचकरून घ्यावे. मिक्सिंगच्या भांड्यात वितळलेले बटर, साखर आणि व्हेनिला इसेन्स चांगले घोटून घ्यावे. यात कुस्करलेल्या केळ्याचा गर घालून चमच्याने चांगले ढवळून एकत्र करावे. एका भांड्यात अंडी फेटून त्यात हे केळ्याचे मिश्रण घालावे. नंतर दूध घालून चमच्याने चांगले ढवळावे. आता मैदा, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यात घालून चांगले एकत्र करावे आणि सर्वात शेवटी चॉकलेट चिप्स घालावेत.
या रेसपिची खासियत म्हणजे यासाठी इलेक्ट्रिक बॅटरचा उपयोग करावा लागत नाही. फक्त चमच्याने फेटून काम भागते. तयार झालेले हे मिश्रण कपकेकच्या भांड्यांमध्ये दोनतृतियांश इतके भरावे. ओव्हनमध्ये २० मिनिटांपर्यंत बेक करावे. कपकेकमध्ये टूथपिक घालून ते तयार झाले आहेत की नाही ते पडताळून पाहावे. जर का टूथपिकला केक न लागता ती बाहेर आली, तर कपकेक तयार झाले आहेत असे समजावे. ओव्हनमधून बाहेर काढून थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर थोड्यावेळाने सर्व्ह करावेत.
पाककृती – अषिमा गोयल सिराज

First Published on August 1, 2014 3:31 am

Web Title: dont know what to do with your over ripe bananas make banana and chocolate cupcakes
टॅग Food,Lifestyle,Recipe
Just Now!
X