सर्व वैद्यकीय उपकरणांनी सज्ज ड्रोनद्वारे हृद्यरुग्णांपर्यंत रुग्णवाहिकेपेक्षा चार पटीने अधिक वेगात पोहोचणे शक्य असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

स्विडनमधील कारोलिन्स्का संस्थेत हृद्यरुग्णांपर्यंत वेगात पोहोचण्यासाठी संशोधन सुरू होते. या वेळी या संस्थेने अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या ड्रोनद्वारे आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पोहोचविण्याचा यशस्वी प्रयोग केला. स्विडनमधील परिवहन संस्थेने या ड्रोनचा शोध लावला आहे. या यंत्रणेद्वारे रुग्णाचे हृदयाचे ठोके तपासणे शक्य आहे. त्याचप्रमाणे विजेचा शॉक देऊनही हृदयाचे ठोके पूर्ववत करण्याची सुविधा या यंत्रणेत उपलब्ध आहे. या ड्रोनमध्ये उच्च प्रतीचा कॅमेरा असून अत्याधुनिक स्वनियंत्रित यंत्रणा आहे. हा ड्रोनजवळच्या दहा किलोमीटर परिसरात आपत्कालीन उपचारांसाठी पाठविण्यात आला होता. हा ड्रोन तातडीने रुग्णाच्या घरी जाऊन त्याद्वारे उपचार सुरू झाले, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे. हा ड्रोन तब्बल १६ मिनिटे वाचवू शकतो. हृद्यरुग्णांसाठी एक मिनिटही अत्यंत महत्त्वाचा असतो. ड्रोनमधील सर्व वैद्यकीय सुसज्जता तपासणे, तंत्रज्ञानाची तपासून हा ड्रोन पाठविल्यास हृद्यरुग्णास तातडीने उपचार मिळणे शक्य असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. हे संशोधन नुकतेच जेएएमए या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.