सॅन फ्रान्सिस्को आपल्या अविश्वसनीय वैविध्याबद्दल प्रसिद्ध आहे, आणि हे वैविध्य खाद्यपदार्थांमध्ये देखील दिसून येतं. म्हणूनच यात आश्चर्य नाही की हे जगातील अगदी मोजक्या शहरांमध्ये त्याचा सहभाग आहे जिथे आपण या शहराच्या 49 चौरस मैलांच्या परिसराच्या बाहेर पाउल न टाकता डझनभर देशांमधील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. म्हणजेच, आपण केवळ एक अन्य भोजनाखेरीज एक अनोखा जागतिक अनुभव घेऊ इच्छित असाल तर, सॅन फ्रान्सिस्कोतून बाहेर न पडता अनेक देशांच्या खाद्यपदार्थांचा आनंद आपण कशाप्रकारे घेऊ शकता ते पाहा.

मेक्सिकन – टेकोलिशियस (741 वॅलेन्शिया स्ट्रीट)
खाद्यपदार्थांच्या या यादीमध्ये समावेश करण्यासाठी या मिशनमध्ये भरपूर ठिकाणं आहेत, आणि जर आपण एक मिशन बरिटो एके ठिकाणी घेतले असेल तर आपण त्यापैकी सर्वच ठिकाणी गेला होता असे आपल्याला वाटेल. पण तुम्हाला कुठेही मिळणार नाही असं काहीतरी चाखायचं असेल, जसं शॉट-अँड-अ-बिअर ब्रेज्ड चिकन किंवा कॉर्न, समर स्क्वॉश आणि स्वीट पेपर्स टेकोज, तर तुम्ही टेकोलिशियसला नक्की भेट द्या.

स्पॅनिश – अलेग्रियाज (2018 लोम्बार्ड स्ट्रीट)
आम्हाला माहिती आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आपल्या पसंतीचे खाद्यपदार्थ चाखल्यानंतर आपल्याला काहीतरी अधिक लहान पदार्थांचा शोध घ्यावासा वाटेल. मग आमच्या मते अल्जेरियाजचे – टपास – किंवा स्पॅनिश स्नॅक्स. इथल्या मेन्युवर असलेल्या सर्वात लोकप्रिय डिशेस आहेत एम्पानादिलास दे कार्न, मशेंगो फ्लेम्बिडो, पतातासैलोली आणि बहुचर्चित फ्लॅन. तुम्हाला वाटेल की अटलांटिक महासागर ओलांडून तत्काळ स्पेनमध्येच पोहोचला आहात.

मोरोक्कन – मुराद(140 न्यू माँटगोमेरी स्ट्रीट)
आपण जर मोरोक्सन पदार्थ कधीच खाल्ले नसतील तर, अलिकडचे मिशेलिन स्टार पुरस्कृत रेस्टॉरंट, मुरादला भेट दिल्याखेरीज आपली सॅन फ्रान्सिस्कोची सहल पूर्ण होणार नाही. इथल्या लोकप्रिय मोरोक्कन डिशेसमध्ये, टॅगीन, कुसकुस आणि बिस्तीला समाविष्ट आहेत. तुम्हाला पोट अगदी गच्च करायचं नसेल तर, अधिक भव्य, आणि अधिक परवडणारा भोजनाचा अनुभव घेण्यासाठी मुरादमध्ये लंच आणि डिनर सर्विसच्या दरम्यान बारमध्ये जाऊन पाहा.

फ्रेंच–  ल फोलि  (2316 पोक स्ट्रीट)
ल फोलि हे सॅन फ्रान्सिस्कोमधील रशियन हिलवर वसलेलं अतिशय प्रशंसाप्राप्त तरीही हवंहवंसं, कुटुंबाद्वारे संचालित रेस्टॉरंट आहे. शेफ रोलँड पेसो आणि त्यांची पत्नी जेमी यांनी 1988 मध्ये ल फोलिचा आरंभ केला, आणि, अनेक दशके, पोक स्ट्रीटवरील त्यांच्या मूळ ठिकाणी व्यवसायाची भरभराट केली. ल फोलिच्या डायनिंग रुममध्ये एका विशेष वातावरणात हे खासरित्या तयार केलेले भोजन वाढले जाते, सोबत, अत्याधुनिक लाकडी आणि आरसेयुक्त पॅनल्स, आणि दर्जेदार सेवा हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे.

जर्मन – श्रूडर्स (240 फ्रंट स्ट्रीट)
जर तुम्हाला अचानकपणे ब्रॅटवूर्स्त, स्ट्र्डेल किंवा कोणत्याही प्रकारचं स्नीझेल खाण्याची इच्छा झाली तर, आपण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असल्याचा तुम्हाला आनंदच होईल, कारण तुम्हाला श्रूडर्सचं नावाचं 1893 पासून वेस्ट कोस्टवरील सर्वात जुनं जर्मन रेस्टॉरंट असल्याचं सापडेल. हे रेस्टॉरंट, 1906 च्या भूकंपानंतर त्याच्या आताच्याच ठिकाणी आहे, काही वर्षांपूर्वीच ते पुनर्निर्मित करुन त्याचा नव्या युगात प्रवेश करण्यात आला.

इटालियन – लोकान्दा ओस्टेरिया अँड बार (557 वॅलेन्शिया स्ट्रीट)
नॉर्थ बिच, म्हणजेच वेस्ट कोस्टची इटालियन मक्का, ही चविष्ट इटालियन पदार्थांसाठी मस्त ठिकाण आहे जसे लासांगा, स्पॅगेटी, रेव्हिली आणि, अर्थातच, पिझ्झा. परंतु, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये डझनाच्या डझनावारी इटालियन रेस्टॉरंट्स आहेत आणि एक सर्वोच्च-मानांकित इटालियन आहे ते मिशन डिस्ट्रीक्टमध्ये ज्याचं नाव लोकान्दा आहे, इथल्या मेन्युमध्ये रीगतोनी, प्रोस्कितो, रोस्टेड एगप्लांट अर्थात भाजलेलं वांगे आणि ज्यू पद्धतीने केलेलं आर्तीचोक समाविष्ट आहेत. यांच्या सोबतीला घ्या त्यांची एक खास ओळखीची कॉकटेल आणि तुमची रात्र अद्भुत अनुभवात घालवा.

ग्रिक – सुवला (517 हेज स्ट्रीट)
जर बकलावा लँब, ग्रीक फ्रायीज किंवा गायरोस ही नावं तुम्हाला भुरळ घालत असतील तर, तुम्ही ग्रीक रेस्टॉरंटमध्ये जायलाच हवं. सुदैवाने, इथे सुवला आहे, हेज वॅलिमधलं एक अतिशय-कॅज्युअल, परवडणारा पर्याय जो आपल्या फोटोजेनिक फूड आणि वाजवी किंमतींसाठी अतिशय वेगाने लोकप्रिय होत आहे.

इथियोपियन –न्यू इरित्रिआ (907 आयर्विंग स्ट्रीट)
इथल्या विशिष्ट इथियोपियन पदार्थांमध्ये समाविष्ट आहेत इंजेरा, वॅट, आणि किट्फो. यापैकी कोणतेही शब्द कानावर पडलेले नाहीत असे वाटले तर, थोडे इथियोपियन पदार्थ नक्कीच चाखून पाहण्याची ही वेळ आहे, शक्यतो इथल्या एका सर्वोच्च-मानांकित उपहारगृहामध्ये, जसे की धुक्यानं भरलेल्या, परंतु तरीही स्वादिष्ट सनसेट डिस्ट्रीक्टमधील न्यू इरित्रिआ रेस्टॉरंट अँड बार.

रशियन –रेड टॅवर्न (2229 क्लिमेंट स्ट्रीट)
सॅन फ्रान्सिस्कोमधलं खाद्यपदार्थांचं अतिशय वैविध्य लक्षात घेता, यात आश्चर्य वाटायला नको की तुम्हाला सेंट पीटर्सबर्गला प्रवास करुन न जाता इथेच काही अविश्वसनीय रशियन पदार्थ मिळू शकतात. तुम्हाला बीफ स्ट्रॉंग ऑफ, पेमेनी किंवा कोटलेटी, खावंसं वाटेल तेव्हा रेड टॅवर्नमध्ये तुम्हाला नेमकं हवं तसंच मिळेल.

इंडियन –अँबर इंडिया (25 येरबा ब्युएना एलएन.)
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये भोजनगृहातला जवळपास प्रत्येक मसाल्याचा स्वाद असण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत त्यामुळे एक स्वादयुक्त, अनोखा पदार्थ बनतो ज्याची चव विसरणं शक्य नाही. तेव्हा तुम्ही करी, तंदुरी चिकन किंवा काही मऊ नान किंवा कोणतेही अन्य उत्तर भारतीय खास पदार्थ यांचा आस्वाद घेण्यास इच्छुक असाल तर, सोमामधलं अँबर इंडिया रेस्टॉंरंट तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल.

थाय –थाय स्पाईस  (1730 पोक स्ट्रीट)
थायलंडमधील काही सर्वात लोकप्रिय पदार्थांमध्ये मू नामतोक, ग्रीन करी, सोम टॅम, पॅड थाई आणि थाई फ्राईड राईसयांचा समावेश होतो. यापैकी कोणत्याही चवदार पदार्थांची तुम्हाला आवड असेल तर, थाय स्पाईस रेस्टॉरंट तुमची ही भूक भागवू शकते. आम्हाला आश्चर्य वाटलं की इथे 80 हून अधिक खास थाई पदार्थ मिळतात. अखेर “सॅन फ्रान्सिस्को क्रोनिकल” यामध्ये या रेस्टॉरंटला या शहरातल्या सर्वोच्च पाच थाई रेस्टॉरंट्समध्ये स्थान दिलं आहे.

कोरियन – हान Il क्वान (1802 बलबोआ स्ट्रीट)
किमची, गुक्सू किंवा बोक्केम तुम्हाला लगेचच आवडू लागतील. मग हे जरुरी आहे की तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असताना एक अद्भुत कोरियन रेस्टॉरंट शोधलंच पाहिजे. हान II क्वानला सातत्यानं जबरदस्त रिव्यूज मिळतात आणि चविष्ट पदार्थ आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा या दोन्हींसाठी ते प्रख्यात आहे.

जापनीज – ओझुमो  (161  स्टुअर्ट स्ट्रीट)
सॅन फ्रान्सिस्कोच्या सहलीच्या दरम्यान जर तुम्ही जपानी पदार्थांची चव चाखायला उत्सुक असाल तर, सर्वसामान्य कोणीही ऐतिहासिक जपानटाउनकडे जाण्याचा सल्ला तुम्हाला देईल, पण तुम्हाला हे जाणून आनंद होईल की एम्बरसेडेरोच्या शेजारील ओझुमो रेस्टॉरंट इथे तुम्हाला हवं ते मिळू शकतं. इथल्या मेन्युमध्ये पारंपरिक जपानी पदार्थ जसे सुरुवातील मिसो आणि एदामे, त्यानंतर मुख्य पदार्थ जसे शाबु-शाबु, तेम्पुरा, साशीमी आणि सुशी मिळतात. इथल्या व्यापक मेन्युला जोड दिली आहे साकी लाऊंज आणि खाडीच्या अद्बुत दृश्यांची.

अमेरिकन–  द डोरियन  (2001 चेस्टनट स्ट्रीट)
काहीवेळेस तुम्हाला केवळ एक बर्गर, रिब्ज किंवा नाजुक स्टीक हवी असते त्यासोबत बेक्ड बीन्स आणि टॅटर टॉट्स, यानंतर अॅपलपाय . अमेरिकन खाद्यपदार्थांची सर्वोत्तम चंगळ इथेच आहे. सुदैवाने, तुम्हाला इथे हे सर्वकाही मिळेल शिवाय डोरियनमध्ये आणखी अमेरिकन पदार्थ मिळतील, जिथे बर्गर्स आणि स्टीक्सपासून ते चिकन स्लायडर्स आणि ऑईस्टर्सपर्यंत मरिनामध्ये दिलं जातं.

कॅलिफोर्निया – फॉरेन सिनेमा  (2543 मिशन स्ट्रीट)
या जागतिक सहलीचं अंतिम स्थान पुन्हा तेच आहे जिथून तुम्ही सुरुवात केली होती, कॅलिफोर्निया आणि कॅलिफोर्नियन पदार्थ, ज्यामध्ये भिन्न पाकपद्धतींचा संयोग केला जातो. दुसऱ्या शब्दांत, एका साधी पास्ता डिश किंवा हाउस सॅलड मिळण्याच्या अपेक्षेनं इथं येऊ नका कारण ते तुम्हाला अन्य कुठेही मिळतील. याऐवजी, तुमच्या थाळीमध्ये मजेदार पर्याय जसे सी बास सेविचे किंवा पॅसिफिक अहि सीअर्ड रेअर, समाविष्ट करा जे तुम्हाला फॉरेन सिनेमा इथे मिळू शकतात.