संशोधकांनी आनंदी राहण्याचे एक नवे सूत्र शोधून काढले आहे. मात्र, या सूत्राचे मूळ आपल्या परंपरेमध्येच लपलेले आहे. विशेषत: भाज्या खाण्यासाठी नाके मुरडणाऱ्या लहानग्यांसह मोठय़ांना हे संशोधक आवर्जुन सांगत आहेत की आनंदी राहण्यासाठी फळे व भाज्या जरूर खा. फळे व भाज्यांचे सेवन केल्याने फक्त आनंदीच राहता येते असे नाही, तर त्यामुळे कर्करोग आणि हृदयरोग यावरही नियंत्रण राहते.

फळे व भाजीच्या प्रमाणापेक्षा आठपट जास्त फायदा त्यांच्या सेवनाने होतो. एखाद्या बेकार माणसापेक्षा नोकरी करणाऱ्या माणसाला जितके समाधान मिळेल तितके समाधान फळे आणि भाजी खाणाऱ्याला मिळते. वॉरविक विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ अ‍ॅण्ड्रय़ू ऑस्वल्ड यांच्या मते, फळे व भाज्यांच्या सेवनाने जितके आरोग्य सुधारते तितक्यापटीहून आठपट अधिक तुमच्या आनंदी जीवनात भर पडते.

याबाबत घेण्यात आलेल्या चाचणीनुसार भाज्या व फळे खाल्ल्याने १२ हजार जणांमध्ये २ वर्षांत मानसिक सकारात्मक बदल दिसून आले. त्यामुळे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर भाज्या व फळांना पर्याय नाही.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)