14 August 2020

News Flash

डायबेटिसच्या रुग्णांसाठी वरदान आहे मेथी; जाणून घ्या फायदे

मेथीच्या बिया वातहारक, पौष्टिक, रक्तसंग्राहक व गर्भाशय संकोचक आहेत. बिया रक्त व पित्तवर्धक आहेत.

मेथी, पालेभाजी व मसाल्याचा पदार्थ म्हणून सर्वाच्या वापरात सर्रास आहेच. मेथीची भाजी पथ्थ्यकर भाजी आहे. पाने थंड गुणाची, सारक, पाचक, वातानुलोमक, पित्तनाशक व सूज कमी करणारी आहेत. मेथीच्या बिया वातहारक, पौष्टिक, रक्तसंग्राहक व गर्भाशय संकोचक आहेत. बिया रक्त व पित्तवर्धक आहेत.

पित्तप्रधान मलावरोधात पालेभाजीचा उपयोग पोट साफ करण्याकरिता आहे. पित्तप्रधान ज्वरात मेथीच्या पानांचा रस घ्यावा. जखम व सूज या दोन्ही लक्षणांत मेथीची पाने वाटून लेप लावावा. रक्त पडणाऱ्या आवेत कोवळय़ा पानांची भाजी उपयुक्त आहे. मेथीची पालेभाजी, हृद्रोग, भगंदर, कृमी, खोकला, कफ, वातरक्त, महारोग, उलटी, अरुची, ताप या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी.

बाळंतपणात मेथीच्या बियांचे सुगंधी पदार्थाबरोबर लाडू करून देतात. त्यामुळे बाळंतिणीस चांगली भूक लागते. खाल्लेले अन्न पचते, अजीर्ण होत नाही. शौचास साफ होते. रक्तस्राव कमी होतो. गर्भाशय लवकर पूर्ववत होतो. स्थूलपणा वाढत नाही. कंबरेचा घेर कमी होतो.

मेथी वात व पित्तप्रकृती रुग्णांकरिता उत्तम आहे. मेथी बियांचे विशेष कार्य पचनसंस्थांवर आहे. मेथी चावून खायला लागल्यापासून लाळास्राव उत्तम सुरू होतो. आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक मधुमेह या व्याधीकरिता जी एकमेव वनस्पती मानतात, ती म्हणजे मेथी होय. मेथी बियांचा प्रत्येक कण तोंडातील, आमाशय, पच्यमानाशय, स्वादुपिंड या आतडय़ातील गोडपणावर, कफावर कार्य दरक्षणी करीत असतो. त्यामुळे नुसत्या मेथ्या चावून खाणे, सकाळी मेथीपूड पाण्याबरोबर घेणे, मेथ्या उकळून त्याचे पाणी पिणे, मेथीकूट खाणे, मेथी पालेभाजी खाणे, मेथी पालेभाजीचा रस पिणे असे अनेक उपाय जगभर मधुमेही माणसे यशस्वीपणे करीत आहेत. सर्वात सोपा उपाय म्हणजे एक चमचा मेथीपूड एक पोळीला लागणाऱ्या कणकेत मिसळून अशा हिशोबात पोळय़ा खाणे. यामुळे रक्तातील साखर कमी होते. नियंत्रित राहते. शरीराचा बोजडपणा कमी होतो.

मेथीच्या बियांमुळे आमाशयातील कफाचे विलयन व यकृताचे स्राव निर्माण करणे, वाढवणे, आहार रसांचे शोषण ही कार्ये होतात. आमवातात रसादि धातू क्षीण व दुर्बल होतात. हृदय दुर्बल होते. त्याकरिता मेथी व सुंठ चूर्ण मिसळून भोजनोत्तर घ्यावे. शरीर निरोगी व सबल होते. मेथीच्या फाजील वापराने शुक्रनाश होण्याची शक्यता असते. गरगरणे, चक्कर, अंधेरी ही लक्षणे दिसल्यास मेथीचा वापर करू नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 1:48 pm

Web Title: eiting methi beneficial for diabetes patients nck 90
Next Stories
1 मध आणि दालचीनीच्या मिश्रणाचं सेवन केल्यास होतील हे फायदे
2 डोळ्याखालची Dark Circles घालवायची आहेत? हे आहेत घरगुती उपाय
3 Iphone असेंबल करणारी ‘ही’ कंपनी भारतात सुरू करणार प्रकल्प
Just Now!
X