फेसबुकवर ‘व्ह्यू अॅज पब्लिक’ या फीचरचं पुनरागमन झालं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव फेसबुकने मागील वर्षी हे फीचर काढून टाकले होते. पण आता फेसबुकने हे फीचर पुन्हा आणलं आहे. या फीचरद्वारे आपलं अकाउंट इतरांना कसं दिसतं हे पाहता येतं.
गेल्या वर्षी या फीचरच्या मदतीने एका हॅकरने जवळपास पाच कोटी फेसबुक प्रोफाइलची माहिती मिळवली होती. ही बाब समोर आल्यानंतर फेसबुकने तातडीने हे फीचर हटवलं होतं. त्यावेळी सुरक्षिततेच्या कारणास्तव फेसबुकला सुमारे 9 कोटी युजर्सच्या अकाउंटमध्ये लॉग बॅक करावे लागले होते. या फीचरच्या मदतीने यूजर आपलं प्रोफाईल दुसऱ्या यूजरच्या प्रोफाईलवरुन कसं दिसतं हे पाहू शकतो. याशिवाय फ्रेंडलिस्टमध्ये नसलेल्या इतर युजर्सनाही आपले प्रोफाइल कसे दिसते हे पाहता येते.
फेसबुकने सप्टेंबर 2018 मध्ये ‘व्ह्यू अॅज पब्लिक’ हे फीचर हटवले होते. आता फेसबुकने हे फीचर म्हणून एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
First Published on May 16, 2019 12:52 pm