खात्यातून पैसे काढणे किंवा खात्यातील बॅलन्स तपासणे एटीएममुळे सुलभ झाले आहे. परंतु, एटीएम वापरत असताना योग्य सावधगिरी न बाळगल्यास जोखमीचे ठरू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 2018-19 मध्ये एटीएम घोटाळ्याच्या 233 केसेस नोंदवण्यात आल्या. देशातील ही सर्वाधिक संख्या आहे. अशा परिस्थितीत, एटीएम वापरणाऱ्यांनी एटीएम वापत असताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

एटीएम वापरत असताना पुढील 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा
एटीएममध्ये असताना अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे गरजेचे आहे. तिथली लोक तुम्हाला कोणती ना कोणती मदत करण्यासाठी पुढे सरसावू शकतात, पण अशी लोक स्कॅमर असतात आणि ते तुमची वैयक्तिक माहिती देण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही सावध राहणे आवश्यक आहे आणि एटीएम बूथमध्ये तुमच्याशिवाय अन्य कोणी नसेल, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

तुमचा एटीएम पिन कंपनीच्या प्रतिनिधींना देऊ नका
तुमचा वैयक्तिक बँकिंग तपशील मागणारे टेक्स्ट मेसेज किंवा कॉलल बँकेकडून किंवा अनोळखी नंबरवरून येण्याचे प्रकार अनेकदा घडतात. कोणालाही तुमचा एटीएम पिन नंबर देऊ नका. तुमच्या बँकेतून कॉल करत असल्याचा दावा करण्यात आला तरीही देऊ नका. गैरवापर करण्याच्या हेतूने तुमची वैयक्तिक माहिती काढून घेण्याची ही घोटाळेखोर पद्धत आहे.

एटीएम पिन वेळोवेळी बदला
तुमचा एटीएम पिन पैसे काढण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो सहज लक्षात राहावा म्हणून जन्मतारिख किंवा बाइक नंबर असा सोपा पिन ठेवणे घातक ठरू शकते. म्हणूनच, तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात राहणार नाही किंवा त्यांना त्याचा गैरवापर करता येणार नाही, असा अवघड पिन ठेवावा. सुरक्षेच्या दृष्टीने एटीएम पिन वेळोवेळी बदलावा.

एटीएम वापरत असताना आजूबाजूला लक्ष द्या
एटीएम वापरणे सोयीचे असल्याने एटीएमच्या बाहेर नेहमी गर्दी असते. हे मशीन वापरताना आजूबाजूला लक्ष ठेवणे गरजेचे आहे. एटीएम पिन नंबर टाकत असताना स्क्रीन पूर्ण झाकला जाईल आणि रांगेत उभी असणारी पुढील व्यक्ती स्क्रीन पाहू शकत नाहीये, याची खात्री करावी. खातरजमा करण्यासाठी पुढील व्यक्तीचा व्यवहार पूर्ण होईपर्यंत थांबावे.

एटीएम पिन कुटुंबीयांना व मित्रांना देऊ नका
सुरक्षितपणे बँकिंग व्यवहार करण्यासाठी तुमचा एटीएम पिन नंबर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच पिन तुमच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना देऊ नका. भांडणे झाल्यास किंवा नात्यांमध्ये ताणतणाव आल्यास हे घातक ठरू शकते. तुमचे डेबिट कार्ड इतरांना वापरायला देणे, हे बेकायदा ठरू शकते. कारण, नॉन-ट्रान्स्फरेबल नियम म्हणून बँक ते नाकारू शकते.

तुमचा मोबाइल नंबर नोंदवा
यामुळे खातेधारकांना एसएमएसवर व्यवहाराचे अलर्ट मिळू शकतील. अनधिकृतपणे पैसे काढले गेल्यास तातडीने बँकेला कळवावे. आरबीआयच्या ग्राहकांसाठी अनुकूल धोरणांच्या अनुसार, ग्राहकांनी घोटाळेखोर व्यवहार नोंदवल्यावर त्यांना तातडीने संरक्षण मिळू शकते. एटीएम घोटाळ्यांची वाढती संख्या पाहता, तुमच्या एटीएम कार्डाच्या सुरक्षेसाठी आणि विशेषतः एटीएम मशीनचा वापर करत असताना वरील पथ्ये पाळणे आवश्यक आहे.

(विरेंदर बिश्त, सह-संस्थापक व सीटीओ, नियो )