ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात कायम वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर होत असतात. ऑनलाइन कंपन्याही यामध्ये मागे नाहीत. सध्या स्मार्टफोनच्या कंपन्यांमध्येही जोरदार स्पर्धा सुरु असताना कंपन्यांमध्ये आपला फोन विकण्यासाठी अक्षरश: चढाओढ सुरु असल्याचे दिसते. फ्लिपकार्टही आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देत ऑकर्षित करण्यात मागे नाही. नुकताच फ्लिपकार्टने आपला अनोखा सेल आयोजित केला असून त्यामध्ये स्मार्टफोनवर विशेष सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर या ऑफर्स तुम्हाला माहित असायलाच हव्यात. पाहूयात कोणत्या मोबाईलवर किती सूट मिळू शकते.

Samsung Galaxy S7 : हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर ५० टक्के डिस्काऊंटने उपलब्ध आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला केवळ २२,९९० रुपयांना मिळू शकतो. यामध्ये ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे. यामध्ये दरमहा तुम्हाला कमीतकमी २,५५५ रुपये भरावे लागू शकतात. याशिवाय एक्सचेंज ऑफर घेतल्यास आणखी फायदा मिळू शकतो.

Asus Zenfone Zoom : फ्लिपकार्टवर हा फोन ६० टक्के डिस्काऊंटने १४,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. एक वर्षाची वॉरंटी असलेला हा फोन ४ जीबी रॅमचा असून ६४ जीबी स्टोरेजचा आहे.

OPPO F3 Plus : ओप्पोच्या या फोनवर २१ टक्के डिस्काऊंट मिळणार असून तो १७,९९० रुपयांना खरेदी करता येणार आहे. १,९९९ रुपयांच्या ईएमआयवर हा फोन खरेदी करता येणार आहे.

Lenovo Phab 2 : लिनोव्हो कंपनीचे फोन मागच्या काही महिन्यात जोरदार गाजले आहेत. यांचा खपही मोठ्या प्रमाणात झाला. कंपनीच्या Lenovo Phab 2 या फोनवर चांगली ऑफर देण्यात आली असून २० टक्के डिस्काऊंटने १७,९९९ रुपयांना मिळणार आहे.

Moto Z2 Play : मोटो कंपनीचा फोन फोटो काढण्यासाठी आणि व्हॉईससाठी स्पेशल म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तरुणांमध्ये या फोनविषयी विशेष आकर्षण आहे. फ्लिपकार्टवर हा फोन २१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. याबरोबरच जुना फोन देऊन हा फोन खरेदी करणार असाल तर आणखी ऑफर दिली जाणार आहे.