News Flash

Flipkart ने लाँच केला पहिला लॅपटॉप, किंमत…

भारतीय युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन इंटेल आणि माइक्रोसॉफ्टच्या मदतीने हा लॅपटॉप डेव्हलप

ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टने आपला पहिला लॅपटॉप लाँच केला आहे. फ्लिपकार्टने ‘MarQ by Flipkart’ या ब्रँडअंतर्गत लॅपटॉप आणला असून Falkon Aerbook असे नाव देण्यात आले आहे. 39,990 रुपये इतकी किंमत असलेला हा लॅपटॉप 17 जानेवारीनंतर फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. Falkon Aerbook लॅपटॉप इंटेल आणि माइक्रोसॉफ्टसह भागीदारी करुन डेव्हलप करण्यात आला आहे. भारतीय युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन हा लॅपटॉप डेव्हलप केल्याचा कंपनीचा दावा आहे.

या लॅपटॉपमध्ये 13.3 इंच डिस्प्ले असून Intel 8th Gen core i5 प्रोसेसरवर हा लॅपटॉप कार्यरत असेल. या लॅपटॉपमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी सॉलिड-स्टेट स्टोरेज असून एक्स्ट्रा एसडीडी स्लॉटच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढवता येईल. 37W-hr बॅटरी देण्यात आली असून 5 तासांचा बॅकअप मिळेल असं कंपनीने म्हटलं आहे.

ग्राहकांनी आमच्या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे त्यांना कोणते स्पेसिफिकेशन्स असलेला लॅपटॉप हवाय याची कल्पना आली. त्याद्वारेच आम्ही Falkon Aerbook मध्ये बेस्ट इन-क्लास फीचर्स दिले आहेत, त्यामुळे हा लॅपटॉप व्हॅल्यू फॉर मनी डिव्हाइस ठरतो. इंटेल आणि माइक्रोसॉफ्टच्या मदतीने आम्ही दर्जेदार परफॉर्मन्स असलेला लॅपटॉप भारतीय ग्राहकांसाठी आणलाय. अशी प्रतिक्रिया फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष (प्रायव्हेट ब्रँड्स) आदर्श मेनन यांनी लाँचिंगवेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 12:18 pm

Web Title: flipkart launches falkon aerbook thin and light laptop for rs 39990 sas 89
Next Stories
1 गाडी पार्किंग डोकेदुखी ठरतेय? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
2 10 हजारात बुकिंगला सुरूवात, जाणून घ्या कशी आहे Hyundai Aura ?
3 विक्रीची सुरूवात पुण्यातून, Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कुटर उद्या होणार लाँच
Just Now!
X