फोर्डने बाजारात इकोस्पोर्टचे नवीन मॉडेल दाखल करुन अवघे ६ महिने झाले असताना आता कंपनीने आपले याच सिरीजमधील आणखी एक मॉडेल दाखल केले आहे. कंपनीने नुकतीच फोर्ड इकोस्पोर्ट एस (Ford Ecosport S) आणि फोर्ड इकोस्पोर्ट सिग्नेचर (Ford Ecosport Signature) अशी दोन मॉडेल बाजारात आणत ऑटोमोबाइल क्षेत्रातील स्पर्धेत भर घातली आहे. इकोस्पोर्ट सिग्नेचरची निर्मिती मर्यादेत कऱणार असल्याचे कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे. या पेट्रोल कारची किंमत १० लाख ४० हजार तर डिझेल कारची किंमत १० लाख ९९ हजार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. इकोस्पोर्ट एस ची किंमत १० लाख ४० हजार ते ते ११ लाख ८९ हजार असेल.

‘फिल्स लाइक फॅमिली प्रॉमिस’ ही या नव्या कारसाठीची टॅगलाईन आहे. या टॅगलाईनचा वापर करत कंपनी ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असेल असे फोर्ड इंडियाचे अध्यक्ष अरूण मेहरोत्राने यांनी सांगितले. दिलेल्या माहितीनुसार, फील्स प्रोमिससोबत ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधिल असणार आहे. या एडिशनमध्ये कंपनीने १ लीटरला इकोबूस्ट पेट्रोल इंजिन लावलं आहे. तर १२४ एचपी पॉवर आणि १७० एनएम पीक टॉर्क जनरेट केलं आहे. कंपनीने या कारला नव्या अंदाजात सादर केलं असल्याने ती अलिशान वाटत आहे. कारमध्ये एचआयडी हँडप्लस आहे जिथे फॉगलॅप्ससोबत आहे. यासोबतच कारमध्ये १७ इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आला आहे.

मागच्या काही काळात फोर्डची विक्री कमी झाल्याने कंपनीने या नव्या कार दाखल कऱण्याचा निर्णय घेतला आहे. इकोस्पोर्ट कारच्या जुन्या मॉडेलची विक्री मागील काही महिन्यांपासून घसरत आहे. जानेवारीमध्ये या कारची विक्री ६८३३ झाली होती, तर फेब्रुवारीमध्ये हा आकडा ५४३८ वर आला होता. मार्चमध्ये ५३४४ आणि एप्रिलमध्ये ४१२८ वर आला होता. त्यामुळे नवीन मॉडेल्स बाजारात दाखल करत एक नवा प्रयत्न केला आहे.