आपण कुणाशी मैत्री करणार, कुणाला त्यासाठी लायक समजणार नाही या गोष्टी आपल्या शरीरातील जनुकेच ठरवत असल्याचे एका संशोधनात आढळले आहे. जनुकांच्या निवडीवर व्यक्ती त्यांच्या मित्रांची निवड करत असतात. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील डॉ. जेम्स  यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.
जनुके आणि मैत्री यांच्यामधील संबंध शोधण्यासाठी डॉ.जेम्स यांनी याबाबतचे संशोधन केले. त्यांनी दोन मोठ्या आरोग्य परिक्षणातील आकडेवारीचा अभ्यास केला. मैत्रीसाठी अधिक महत्वाची असणारी जनुके पाहण्यासाठी त्यांनी सहा जनुकांमधील काही जीनमार्कर शोधले. ज्या लोकांचे जीन मार्कर एकसारखे असतात त्यांच्यामध्ये मैत्री होण्याची शक्यता अधिक असते. ‘डीआरडी-२’ नावाचे जीन मार्कर दारु पिण्याची इच्छा नियंत्रित करत असून हे जनुक असणारी व्यक्ती असेच जीन मार्कर असलेल्या लोकांकडे पाहतात. समस्वभावाच्या किंवा समशीलाच्या व्यक्तींमध्ये मैत्री संभवते असे जे आपण म्हणतो त्याचेच हे शास्त्रीय कारण आहे.