गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन 11 धोकादायक मोबाइल अ‍ॅप्स हटवले आहेत. हटवलेले सर्व अ‍ॅप्स ‘मॅलवेअर जोकर’ या व्हायरसने इन्फेक्टेड होते. युजर्सनाही हे अ‍ॅप्स डिलिट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Check Point च्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, जोकर मॅलवेअर हटवलेल्या सर्व अ‍ॅप्समध्ये नव्या रुपात होता. हॅकर्स या अ‍ॅप्सद्वारे युजर्सच्या परवानगीशिवाय त्याला प्रीमियम सर्व्हिससाठी सबस्क्राइब करायचे. अखेर गुगलने हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत. या वर्षीच्या सुरूवातीला गुगलने 1700 अ‍ॅप्सची एक यादी जारी केली होती. त्यावेळीही ‘जोकर मॅलवेअर’मुळे ते सर्व अ‍ॅप्स हटवले होते.

ही आहे हटवलेल्या अ‍ॅप्सची यादी –
-com.imagecompress.android

-com.contact.withme.texts

-com.hmvoice.friendsms

-com.relax.relaxation.androidsms

-com.cheery.message.sendsms  (दोन प्रकार)

-com.peason.lovinglovemessage

-com.file.recovefiles

-com.LPlocker.lockapps

-com.remindme.alram

-com.training.memorygame