इंटरनेट ब्राउजिंगसाठी गुगलच्या क्रोम ब्राउजरचा वापर करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. गुगल सध्या क्रोमच्या नव्या अपडेटवर काम करत आहे. नवीन अपडेट तुमच्या लॅपटॉपच्या बॅटरीसाठी महत्त्वाचं ठरेल, कारण या नव्या अपडेटमुळे लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढेल असं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरात कोट्यवधी युजर्स गुगलच्या क्रोम ब्राउजरचा वापर करतात. पण या ब्राउजरमुळे बॅटरी लवकर संपते अशीही अनेकांची तक्रार असते. युजर्सची ही समस्या दूर करण्यासाठी गुगल आता एक खास फीचर आणणार आहे.  ‘विंडोज क्लब’च्या रिपोर्टनुसार, क्रोमच्या नवीन अपडेटमध्ये एका खास यंत्रणेद्वारे वेबपेजच्या बॅकग्राउंडमधील ‘जावास्क्रिप्ट टाइमर’वर (Javascript timer wake ups) निर्बंध येतील. याचा थेट फायदा लॅपटॉप किंवा डिव्हाइसच्या बॅटरीला होईल आणि बॅटरी लाइफ वाढेल. यासाठी गुगलने एक टेस्ट घेतली. त्यामध्ये ३६ ‘टॅब’ बॅकग्राउंडला ओपन ठेवण्यात आल्या. त्यात ‘जावा स्क्रिप्टटाइमर’ एक मिनिटावर सेट करण्यात आला. त्यानंतर कॉम्प्युटरला दोन तासांची अतिरिक्त बॅटरी लाइफ मिळाल्याचं समोर आलं आहे.

याशिवाय बॅटरी लाइफसाठी गुगलने अन्य काही चाचण्याही घेतल्या आहेत. क्रोम, विंडोज, मॅक आणि अँड्रॉइडसाठी हे नवीन फीचर उपलब्ध होईल. हे फीचर क्रोमच्या नव्या अपडेटमध्ये उपलब्ध होईल अशी माहिती आहे. पण नवीन अपडेट कधीपर्यंत रोलआउट होईल याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही. पण, लवकरच हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google chromes next update could help increase battery life of your laptop by up two hours sas
First published on: 06-07-2020 at 14:55 IST