गुगल लवकरच एक नवी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. गुगल कंपनी आपल्या वर्ड प्रोसेसर अॅप ‘गुगल डॉक्स’मध्ये एक नवं फिचर ‘ग्रामर सजेशंस’ची चाचणी घेत आहे.

चाचणी पूर्ण झाल्यानंतर या फिचरचा थेट गुगलच्या स्पेल-चेकिंग टूलमध्ये समावेश केला जाईल. याद्वारे युजरला व्याकरणाच्या चुका सुधारण्यास मदत होईल. या नव्या फिचरद्वारे चुकीचे शब्द निळ्या रंगामध्ये दाखवले जातील. अद्याप यावर चाचणी सुरू असून थोड्याच दिवसांमध्ये काही ठराविक युजर्सना याचा वापर करता येणार आहे.

युजर्सकडून कोणत्या चुका होतात हे लक्षात आल्यानंतर या सेवेमध्ये खूप चांगली सुधारणा होईल, कारण युजर्सच्या चुकांद्वारे हे फिचर वेळोवेळी अपडेट केलं जाईल असं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.