स्मार्टफोन वापरणारा जवळपास प्रत्येक युजर रोजच्या जीवनात कधीतरी इमोजीचा वापर करतो. अनेकांना तर प्रत्येक मेसेजमध्ये इमोजीचा वापर करायला फार आवडते. अशाच सतत इमोजी वापरणाऱ्या युजर्ससाठी गुगलने एक नवं फीचर आणले आहे. गुगल जी-बोर्डसाठी कंपनीने एक नवीन फीचर रोल आउट करायला सुरूवात केलीये. या फीचरला इमोजी किचन (Emoji Kitchen)असे नाव देण्यात आले आहे.

Emoji Kitchen या फीचरद्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे इमोजी ‘कस्टमाइज’ करु शकतात. या फीचरद्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे इमोजी मर्ज करुन नवीन इमोजी बनवू शकतात. गुगलने हे फीचर रोलआऊट करण्यास सुरूवात केलीये. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला प्ले-स्टोअरमध्ये जाऊन गुगल जीबोर्ड अॅप अपडेट करावं लागेल.

आणखी वाचा –  (पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी) 

आणखी वाचा – (Vodafone ची भन्नाट ऑफर, रिचार्जवर मिळवा ₹2500 कॅशबॅक)

आणखी वाचा – कसा आहे शाओमीचा स्वस्त फोन Redmi 8A dual?, जाणून घ्या खासियत

याशिवाय काही दिवसांपूर्वीच Google ने एक नवी सेवा आणली आहे. प्रीपेड युजर्ससाठी गुगलने सर्चद्वारे मोबाइल रिचार्ज करण्याचे फीचर आणले आहे. गुगलच्या या नव्या फीचरद्वारे अँड्रॉइड फोनवर प्रीपेड मोबाइल रिचार्ज प्लॅन्स सर्च करता येतात, तसेच कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे याची तुलनाही करता येते. याशिवाय सर्चद्वारेच तुम्ही मोबाइलही रिचार्ज करु शकतात. अँड्रॉइड फोनमध्ये गुगल अकाउंटवर Sign In केलेल्या युजर्सनाच या फीचरचा वापर करता येईल. यामध्ये एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, रिलायंस जिओ आणि BSNL च्या प्रीपेड प्लॅन्सचा समावेश आहे.

कसा करायचा वापर –
-गुगलच्या या नव्या फीचरद्वारे युजर्स Google Search चा वापर करुन केवळ स्वतःचाच नाही तर इतरांचाही नंबर रिचार्ज करु शकतात.
-याचा वापर करण्यासाठी युजर्सना आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये prepaid Mobile recharge, Sim recharge किंवा recharge यांसारखे शब्द टाकून सर्च करावं लागेल.
-यानंतर रिझल्टमध्ये तुम्हाला मोबाइल रिचार्ज सेक्शन (Mobile recharge Section) दिसेल. येथे युजर्सना मोबाइल नंबर, टेलिकॉम ऑपरेटर आणि सर्कल यांसारखे पर्याय निवडावे लागतील.
-काही युजर्सना सर्चमध्ये ही सर्व माहिती आधीच भरलेली दिसू शकते. यानंतर युजर्सना Browse Plans वर क्लिक करावं लागेल.
-आता गुगल तुम्हाला तुम्ही निवडलेल्या टेलिकॉम ऑपरेटरचे सर्व उपलब्ध प्रीपेड प्लॅन्स दाखवेल. समोर आलेल्या यादीमधून तुम्ही आवडीचा रिचार्ज प्लॅन निवडू शकतात.
-एकदा प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर व्हॅलिड ऑफर्सची यादी येईल. यानंतर युजर्स ऑफर प्रोव्हाइडर्सवर टॅप करु शकतात. सध्या Freecharge, MobiKwik, Google Pay आणि Paytm यांसारखे प्रोव्हाइडर्स लिस्टेड आहेत.
-एकदा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर प्रोव्हाइडर्सच्या कन्फर्मेशन पेजवर Back to Google बटण दिलेले असते, याद्वारे युजर्स पुन्हा सर्चवर येतात. कन्फर्मेशन पेजवर युजर्सना रिचार्जबाबत कस्टमर सपोर्ट इंन्फॉर्मेशनचा अ‍ॅक्सेसही दिला जातो.