News Flash

लवकरच गुगल सांगणार कोण करतंय कॉल, TrueCaller सारख्या फिचरवर सुरू आहे काम

गुगल लवकरच TrueCaller ला देणार पर्याय

(संग्रहित छायाचित्र)

आघाडीची सर्च इंजिन कंपनी गुगल लवकरच TrueCaller ला पर्याय म्हणून ‘Phone by Google’ हे अ‍ॅप नवीन व्हर्जनमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. मात्र, अद्याप गुगलकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गुगलच्या या नव्या अ‍ॅपचं नाव Google Call असेल. याद्वारे कॉलर आयडी आणि स्पॅम प्रोटेक्शनची सुविधा मिळेल. गुगलच्या या अ‍ॅपची एक जाहिरात युट्यूबवरही आली आहे. मात्र, अद्याप हे अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध झालेलं नाही. लवकरच गुगल हे अ‍ॅप अधिकृतपणे रोलआउट करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. युट्यूबवरील जाहिरातीमध्ये “lets you answer with confidence” कॅप्शनचा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, गुगल फोन अ‍ॅपमध्ये नुकतेच कॉलरचं नाव वाचण्यासह अन्य अनेक नवीन फिचर्स जोडण्यात आले आहेत. गुगलने या अ‍ॅपमध्ये ऑटो डिलेशन फिचरही दिलं आहे. या फिचरमुळे 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेल्या कॉलरची हिस्ट्री अ‍ॅपमधून डिलिट होते. या अ‍ॅपमध्ये “Saved voicemails” चा शॉर्टकटही आहे. गुगल फोन अ‍ॅप हे पिक्सेल सीरिजच्या फोनसाठी प्राइमरी डायलर आहे, शिवाय गुगल फोन अ‍ॅप आता नॉन पिक्सेल फोन युजर्ससाठीही उपलब्ध झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:14 pm

Web Title: google is secretly working on a new truecaller like app know details sas 89
Next Stories
1 कारच्या सेफ्टीवरुन टोमणा मारणाऱ्या टाटा मोटर्सला मारुती सुझुकीने दिलं जबरदस्त प्रत्युत्तर!
2 आता Zoom मिटिंगमध्ये व्यत्यय आणला तर होणार कारवाई, कंपनीने आणलं नवं फिचर
3 स्वस्त झाले Oppo चे चार जबरदस्त स्मार्टफोन, किंमतीत झाली कपात; जाणून घ्या नवी किंमत
Just Now!
X