23 January 2021

News Flash

ट्रॅफिक नियम तोडल्यास अलर्ट देणार Google Maps, नवीन ‘स्पीडोमीटर’ फीचर

भारतातील अनेक शहरांमध्ये स्पीड कॅमेरे लागले आहेत, त्यामुळे...

गुगलने आपलं लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप ‘गुगल मॅप्स’च्या अँड्रॉइड व्हर्जनसाठी एक नवं फीचर आणलं आहे. या ‘स्पीडोमीटर’ फीचरच्या मदतीने तुम्ही किती वेगाने गाडी चालवत आहात याबाबत कळेल. हे फीचर ‘गुगल मॅप्स’ या अॅपच्या ‘सेटिंग्स’ मेन्यूमध्ये उपलब्ध आहे. तेथून हे फीचर सुरू करता येईल. या नव्या फीचरआधीच ‘गुगल मॅप्स’ने सर्व युजर्ससाठी ‘स्पीड लिमिट’ हे फीचर रोलआउट केलं आहे. गुगलने ‘स्पीड लिमिट’ आणि ‘स्पीड कॅमेरा रिपोर्टिंग’ या फीचर्सची दोन वर्षांपर्यंत चाचणी घेतली, त्यानंतर भारतासह 40 देशांमध्ये कंपनीने हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करुन दिलं आहे.

भारतातील अनेक शहरांमध्ये स्पीड कॅमेरे लागले आहेत, त्यामुळे ‘गुगल मॅप्स’चं हे फीचर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस आणि दंड भरण्यापासून वाचवेल. नव्या स्पीड लिमिट फीचरमुळे युजर्सना एखाद्या रस्त्यावरील ठरलेली वेगमर्यादा कळेल आणि याच आधारे जर ड्रायव्हरने कमाल वेगापेक्षा अधिक वेगाने गाडी नेण्याचा प्रयत्न केला तर ‘स्पीडोमीटर’ फीचरद्वारे अलर्ट मिळेल. ‘स्पीडोमीटर’ फीचर सुरू झाल्यानंतर गुगल मॅप्सच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला ड्रायव्हिंग स्पीड दिसेल.

‘स्पीड लिमिट’ या फीचरमुळे गाडी चालवताना इंडिकेटरचा रंग लाल होईल, याद्वारे तुम्ही ठरलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवतायेत आणि ट्रॅफिक नियम मोडला जातोय हे तुमच्या लक्षात येईन. तुमच्या मोबाइल इंटरनेटच्या स्पीडनुसार अॅपवरील रिझल्ट येण्यासाठी वेळ लागू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2019 3:51 pm

Web Title: google maps rolls out new feature speedometer sas 89
Next Stories
1 व्यसनमुक्तीचा डिजिटल मार्ग… दारु, सिगरेट प्यायल्यास शॉक देणारे ब्रेसलेट
2 International Yoga Day 2019: ऑफिसच्या डेस्कवरही सहज करता येतील अशी योगासने
3 Mahindra ची ऑफ-रोड एसयुव्ही Thar 700 लाँच, जाणून घ्या किंमत
Just Now!
X