News Flash

मराठी नेटकऱ्यांसाठी खुशखबर: इंग्रजी टाइप केलं तरी गुगल देणार मराठी रिझल्ट

आता गुगल सर्च केल्यास रिझल्ट मराठीत येणार...

(फोटो क्रेडिट - गुगल)

दिग्गज टेक कंपनी गुगलने आज एका इव्हेंटमध्ये भारतात नवीन भाषा फिचर लाँच करण्याची घोषणा केली. गुगलने भारतात आपलं नवीन बहुभाषी मॉडेल MuRIL लाँच केलंय. नवीन फिचरमुळे गुगलच्या विविध सेवांना भारतातील स्थानिक भाषेचा सपोर्ट मिळेल.

आता युजर्सनी मोबाइल फोनवर गुगल सर्च केल्यास रिझल्ट इंग्रजीशिवाय तेलगू, तामिळ, बांगला आणि मराठी भाषेतही दिसेल. आतापर्यंत गुगल सर्चचा रिझल्ट हिंदी आणि इंग्रजी भाषेतच येत होता. पण आता स्थानिक भाषांमध्येही युजर्सना हा रिझल्ट मिळेल. याशिवाय गुगल मॅप्समध्येही तुम्हाला सिस्टिममधील भाषा न बदलता 9 भाषांमध्ये रिझल्ट दिसेल.

 

नवीन फिचरमुळे युजर्सना Google असिस्टंटमध्येही आवडीच्या भाषेचा पर्याय मिळेल. युजर्स अ‍ॅप सेटिंग्समध्ये जाऊन आवडीची भाषा निवडू शकतात. याशिवाय, कंपनीने ‘गुगल लेन्स’साठी ‘होमवर्क’ नावाचं एक नवीन फिचर आणलं आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना गणिताच्या समस्या सोडवण्यास मदत होईल. ही सेवा हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 3:14 pm

Web Title: google search result will be in marathi language now multilingual model muril launched sas 89
Next Stories
1 दोन तासांसाठी ठप्प झालं होतं Telegram , एकाच आठवड्यात तीन मोठ्या कंपन्यांच्या सेवांना बसला फटका
2 वाहनांची देखभाल करा, आयुर्मान वाढवा
3 केसांमध्ये सतत कोंडा होतो? मग लिंबाच्या वापरामुळे करा ही समस्या दूर
Just Now!
X